Horoscope Today : आजचा दिवशी तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मेष ते मीन राशीपर्यंत सर्व १२ राशींसाठी आजचा दिवस कसा असेल हे जाणून घेऊया
मेष: आपला आत्मविश्वास उत्तम असणार आहे. आर्थिक कामे मार्गी लागत असल्याने आपले मनोबल उंचावणार आहे. व्यवसायातील जुनी येणी अनपेक्षितपणे वसूल होणार आहेत. स्वास्थ्य व समाधान लाभेल.
वृषभ : उत्साही राहाल. नवीन उमेदीने नवीन गोष्टीची सुरुवात करण्यास काहीच हरकत नाही. आपले मनोबल वाढणार आहे. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकणार आहात. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे.
मिथुन : मनोबल व आत्मविश्वासाचा अभाव जाणवेल, मानसिक अस्वस्थता राहील. आज आपण कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करू नये. प्रतिकुलता जाणवणार आहे. अनावश्यक मनस्ताप संभवतो.
कर्क : मुला-मुलींसाठी वेळ देऊ शकणार आहात. मानसिक स्वास्थ्य लाभेल. काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकणार आहात. प्रवास सुखकर होतील. आर्थिक कामात सुयश लाभणार आहे.
सिंह : स्वास्थ्य व समाधान लाभणार आहे. तुम्ही आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल. मनोबल वाढणार आहे. सार्वजनिक कामात सुयश लाभेल. आनंदी व आशावादी राहणार आहात.
कन्या: काहींना गुरुकृपा लाभेल. तीर्थक्षेत्री भेट द्याल. प्रवासाचे योग संभवतात. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. तुमच्या आशा-आकांक्षा सफल होतील. कायक्षेत्र अधिक व्यापक होईल.
तुळ : कामाचा ताण जाणवेल. स्वास्थ्य कमी राहील. एखाद्या मनस्तापदायक घटनेला आपल्याला सामोरे जावे लागेल. खर्च वाढणार आहेत. प्रवास शक्यतो टाळावेत. प्रतिकुलता जाणवेल.
वृश्चिक: आरोग्य उत्तम राहील. आज तुमचा मूड चांगला असणार आहे. अनेक कामात सुयश मिळवाल. स्वास्थ्य व समाधान लाभणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव असणार आहे.
धनु: प्रवासात विशेष काळजी घ्यावी. एखादी अप्रिय घटना संभवते. आपले मन शांत व संयमी ठेवण्याचा प्रयत्न करावा. मानसिक अस्वस्थतेमुळे कामामध्ये, लक्ष लागणार नाही. प्रवास टाळावेत.
मकर: अनेकांशी सुसंवाद साधणार आहात. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. मनोबल व आत्मविश्वासाच्या जोरावर अनेक कामे यशस्वी करणार आहात. प्रवासात आनंददायी घटना घडेल.
कुंभ: मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. तुमचे मन आनंदी व आशावादी असणार आहे. काहींना अनेक बाबतीत अनुकूलता लाभणार आहे. खर्च वाढणार आहेत. सार्वजनिक क्षेत्रात मान-सन्मान लावेल.
मीन : प्रवासाचे योग येणार आहेत. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. काहींना अचानक धनलाभ संभवतो. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकणार आहात. अनपेक्षित भाग्यकारक घटना घडेल.