ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या राशी गोचरासोबत नक्षत्र गोचरही महत्त्वाचे ठरते. त्याचे सकारात्मक फरक हे काही राशीच्या लोकांना मिळत असतात. आता शनि आणि गुरु एकामागोमाग एक नक्षत्र गोचर करणार आहेत. चला तर जाणून घेऊयात या राशी कोणत्या ते…
सध्या मेष राशीत गुरु ग्रह विराजमान आहे. शनि हा स्वत:च्या मीन राशीत आहे. गुरु 1 मे पर्यंत याच स्थितीत राहणार आहे. त्यानंतर गुरु वृषभ राशीत गोचर करेल. 6 एप्रिलला शनि राहुच्या शतभिषा नक्षत्रात प्रवेश करेल. त्यासोबत गुरु ग्रह मित्र सूर्य, चंद्र आणि मंगळाच्या कृतिका, रोहिणी आणि मृगशीर्ष नक्षत्रात असेल.
या राशींना मिळणार लाभ
धनु : सध्या राशी स्थिती पाहता अचानक धनलाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. शेअर बाजारातून चांगला परतावा मिळेल. प्रेमप्रकरणात यश मिळेल. तसेच लग्नाचा योग जुळून येईल. आरोग्यविषयक तक्रारी दूर होतील. मुलांकडून आनंदाची बातमी कानावर पडेल.या राशीच्या पंचम स्थानात गुरु विराजमान आहे. तर शनि तिसऱ्या स्थानात आहे. शनि-गुरुची तिसरी दृष्टी पंचम स्थानावर पडत आहे.
मिथुन : या राशीच्या लोकांचे गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्या जातकांना याची उत्तम फळं मिळतील. यामुळे आत्मविश्वासात वाढ होईल. राजकारणात असलेल्या लोकांना या स्थितीचा सर्वाधिक फायदा होईल. गुरुची पंचम दृष्टी तिसऱ्या आणि आणि शनिची सप्तम दृष्टी तिसऱ्या स्थानावर पडत आहे.
सिंह : या राशीच्या लोकांना केलेल्या मेहनतीला अपेक्षित फळ मिळेल, जे स्वप्न पाहाल ते पूर्णत्वास येईल. तसेच देवदर्शनाचा योग जुळून येईल. अध्यात्मात आवड निर्माण होईल. गेल्या काही दिवसांपासून असलेली चिंता दूर होईल. गुरु आणि शनिची नवम दृष्टी भाग्य स्थानावर पडत आहे. नवव्या स्थानावर प्रभावी होत असल्याने नशिबाची उत्तम साथ मिळेल. या कालावधीत मानसिक समाधान लाभेल.