Horoscope Today : आज वर्षाची शेवटची संकष्टी चतुर्थी असणार आहे. तर आज कोणत्या राशींवर बाप्पाची कृपा राहणार , कोणाचा आनंदी काळ सुरु होणार ते पाहुयात. आजचा दिवस सर्व राशीच्या लोकांसाठी फायद्याचा ठरणार आहे. ग्रहांच्या हालचाली बघता आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असून ज्याचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर दिसून येणारा आहे. सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस किती खास असणार आहे? जाणून घ्या आजचे राशीभविष्य.
मेष
आजचा दिवस तुमच्यासाठी शिक्षणामध्ये थोडे फार अडथळे येण्याचा असणार आहे. महिलांचा घरा काम करताना बराच वेळ जाईल. नोकरवर्गाकरिता आनंदाची बातमी मिळेल.
वृषभ
उद्योगावार विशेष प्रेम असेल, अतिशय व्यावहारिक राहाल, त्यामुळे तुम्हाला काही अडचण येणार नाही. कमाईमध्ये ही वाढ होण्याचे योग बनतील.
मिथुन
कष्टाची पर्वा न करता परिस्थितीचा योग्य अंदाज घेऊन प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा तुमचा काळ आहे. आज यश निश्चित लागेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी प्राप्त कराल.
कर्क
लेखकांना त्यांच्या कल्पनाशक्तीला आव्हान देणारे लिखाण करता येणार. नोकरीत समाधानकारक वातावरण लाभेल. प्रमोशन बढती पदोन्नतीचे योग आहे.
सिंह
आज सध्या उजळवून टाकणाऱ्या अशा घटना घडणार आहेत. विद्यार्थ्यांनी जोरदार अभ्यास करायला हवा. नवीन योजना आखल्या जातील. आपल्या कल्पनांना साथीदारांकडून साथ लागेल.
कन्या
नोकरीमध्ये तुम्ही वरिष्ठांची मर्जी जिंकाल. धंद्यात नव नवीन कामे मिळतील. आपल्या वाणीचा आणि व्यक्तीमत्वाचा प्रभाव इतरावर पडेल. कुटुंबामधून सुवर्ता मिळणार आहे.
तूळ
आजूबाजूला आवश्यक असणाऱ्या सुविधा मिळाल्यामुळे कामाचा दर्जा वाढवण्यावर भर असणार आहे. वरिष्ठ आणि वृद्धांच्या आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. चंचलपणावर आवर घाला.
वृश्चिक
घरामध्ये दुरुस्तीची अनेक कामे निघणार असून त्यामुळे घरात जास्त वेळ जाणार. नोकरीत व्यापारात आर्थिक वाढीची बातमी ऐकायला मिळेल.
धनु
व्यवसाय नोकरी बाबत नवीन धोरणांचा वापर कराल आणि त्याची पूर्तताही होईल. नवनवीन कल्पना सुचतील. आणि त्या आमलातही आणाल.
मकर
गोड बोलण्यामुळे इतरांची मनं जिंकून घ्याल, घरामध्ये मनासारखी खरेदी कराल. घरातील व्यक्तींना दिलेले आश्वासन पाळावे. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. आर्थिक नुकसानीची दाट शक्यता आहे.
कुंभ
चैनीच्या वस्तूंची खरेदी करणार. जवळच्या व्यक्तींचा जास्त विचार कराल. नव्या नोकरीचे निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका. घरात तुमचे धोरण सबुरीचे ठेवा. रागावर नियंत्रण ठेवा.
मीन
घरामध्ये मंगल कार्य ठरल्यामुळे उत्साही व आनंदी वातावरण असणार आहे. विवाह जुळतील.भाग्योदयासाठी उपयुक्त वातावरण तयार होईल.