Horoscope Today : आज दर्श पिठोरी सोमवती अमावस्या आणि श्रावणी सोमवार शेवटचा दिवस. आजचा दिवस काही लोकांसाठी चांगला तर काहींसाठी वाईट असू शकतो. आज तुम्हाला कोणत्या समस्यांना समोरं जावं लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारचे लाभ मिळू शकतात? कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा असणार आहे? जाणून घ्या आजचे राशीभविष्य.
मेष : विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षेप्रमाण यश मिळेल. कायदेशीर कामात यश मिळेल. नोकरीत धाडसी निर्णय घ्याल. अपेक्षित यश लाभेल. गृहसौख्य पत्नीची साथ मिळेल.
वृषभ : कोणाच्याही सांगण्यावरून तुमच्या जोडीदारावर संशय घेऊ नका. तुमच्या जोडीदारावरचा विश्वास किती आहे हे पाहण्याची वेळ आलीय.
मिथुन : आरोग्याच्या बाबतीत बोलायचे झाल्यास शरीराला थोडा वेळ विश्रांती द्या. तुम्हाला पाण्याची अॅलर्जी सुद्धा होऊ शकते.
कर्क : विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष द्यायला हवं. तरुणांबद्दल बोलायचं झालं तर, ते नवीन नोकरीच्या शोधात असतील तर त्यांना चांगली बातमी मिळू शकते.
सिंह : विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे खास लक्ष द्यायला हवं आणि चुकीच्या मित्रांच्या संगतीपासून कोसो लांब राहयाला हवं. तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, तुम्ही तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.
कन्या : आज तुमच्या कामावर तुम्ही थोडे चिंतित होऊ शकता. तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांशी फार मोकळेपणाने बोलू नका आणि राजकारणापासून दूर राहा.
तूळ : आज चतुष्पाद करण असल्याने व्यक्तिगत समस्या निर्माण होतील. कर्ज हवे असणारांना त्याची तरतूद करता येईल. फक्त अंथरूण पाहून पाय पसरलेले चांगले पडेल.
वृश्चिक : आपले प्रयत्न सफल होतील. मान सन्मान मिळेल. विरोधकांची मने जिंकाल. व्यापारात भागीदारीत कायदा होण्याचे योग आहेत. औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींना आज भरभरटीचा दिवस आहे.
धनु : आज चंद्रबल अशुभ असल्याने आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी थोडा काळ थांबावे लागेल. घरातील खर्च अपरिहार्य कारणामुळे वाढतील. कोणतेही निर्णय घाईने घेऊ नयेत. नोकरीनिमित्त घराबाहेर रहाण्याचे योग येतील.
मकर : मन प्रसन्न राहिल. बोलण्यातील संभ्रम मात्र दुर ठेवा. नोकरीतील बदल लाभदायक ठरतील. आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव राहिल.
कुंभ : आज शिव योगात तुमच्या उत्तम बुद्धीमत्तेचा योग्य वापर कराल. एखादा धाडसी निर्णय पथ्यावर पडेल. नवीन योजना राबविण्यात यशस्वी व्हाल. उच्च शिक्षण घेणारांना योग्य संधी मिळतील.
मीन : थोडी संघर्षात्मक विरोधात्मक परिस्थिती घरात आणि घराबाहेर निर्माण होऊ शकते. दीर्घकाळ रेंगाळणाऱ्या व्याधींना तोंड द्यावे लागेल. घरातील मोठ्या व्यक्तींशी न पटल्यामुळे ताणतणाव जाणवेल.