प्रत्येक ग्रह त्याच्या वेळेनुसार गोचर करत असतो. याचा प्रभाव प्रत्येक राशीवर होतो. त्यानुसार शनी शनीदेवाचा कुंभ राशीत अस्त झाला आहे. १८ मार्चपर्यंत शनी महाराज याच राशीत विराजमान असणार आहेत. शनी अस्त झाल्यावर सूर्याचा प्रभाव वाढणार आहे. परिणामी शनीची शक्ती कमी होईल व सूर्याचा प्रभाव वाढेल. हा कालावधी काही राशींसाठी अत्यंत शुभ आहे. याचा लाभ कोणत्या राशींना होईल हे पाहूयात.
तूळ रास
शनीचा अस्त हा तूळ राशीसाठी आनंदाने व सुखाने भरलेला आहे. त्यामुळे तूळ राशीच्या लोकांच्या १८ मार्चपर्यंत इच्छा पूर्ण होतील तसेच कामे मार्गी लागतील. प्रॉपर्टी व वाहनाच्या खरेदीचा योग आहे. भौतिक सुख- सुविधा वाट्याला येतील. वाडवडिलांच्या संम्पत्तीचा फायदा तुम्हाला मिळू शकतो.कामाच्या ठिकाणी वरिष्ठांच्या मदतीने मोठे काम पूर्ण करू शकता. धनलाभ संभवतो.
मिथुन रास
मिथुन राशीच्या लोकांना या वर्षी धनलाभाच्या संधी मिळणार आहे. खूप काळापासून अडकून पडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. पती- पत्नीच्या नात्यात गोडवा वाढू शकतो. वैवाहिक आयुष्य सुधारेल. या कालावधीत कोणत्याही प्रकारच्या मेहनतीला पर्याय शोधू नका. विवाह इच्छुक मंडळींना चांगले स्थळ सांगून येऊ शकते.
मेष रास
मेष राशीच्या लोकांच्या करिअरला वेग मिळणार आहे. वरिष्ठांना आपले कष्ट दिसून येतील. आई वडिलांच्या तब्येतीत सुधारणा होऊ शकते. व्यवसाय करत असल्यास त्यातून नवी लोकं आपल्याशी जोडली जातील व्यावसायिकांना मोठा फायदा होऊ शकतो. नव्या नोकरीच्या संधी सुद्धा चालून येऊ शकतात. समाजात मान- सन्मान वाढीस लागू शकतो.