सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं. मात्र, असे अनेकदा होत नाही. परिणामी, अनेक आजारांना आमंत्रण मिळू शकतं. त्यात जर तुमचं 8 तासांचं बसून काम असेल तर तुम्ही तुमच्या शारीरिक हालचालींकडे लक्ष देणं गरजेचं बनलं आहे. तसे केल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो.
आरोग्यविषयक एक सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. त्यामध्ये 7-8 तास सलग बसून काम केल्याने वेळेच्या अकाली मृत्यू होण्याचा जास्त धोका असतो. सीटिंग जॉब शरीरामध्ये हृदयरोग, कर्करोग, टाईप टू डायबिटीजसारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. सीटींग जॉब केल्याने हृदयविकाराबरोबर अनेक समस्यांना झुंज द्यावे लागते. यामध्ये मानसिक आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडतो.
याशिवाय, सतत स्क्रीनकडे पाहिल्याने डोळेदुखी तसेच डोकेदुखीसारखी समस्या उद्भवू शकते. सलग बसून काम असल्यास त्यातून ब्रेक कसा घेता येईल याकडेही लक्ष द्यावे लागते. त्यासाठी पाणी पिण्याच्या निमित्ताने का होईना उठावे. तासातासाला ब्रेक घेणे गरजेचे असते. सलग बसून काम केल्याने शरीरामध्ये बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाणही वाढते. त्यामुळे नियमित व्यायाम करणे गरजेचे होऊन जाते. चालण्याचे प्रमाण वाढवले पाहिजे. या सर्व गोष्टींकडे लक्ष दिल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकते.