पुणे : देशात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आता बूस्टर डोसही लोकांना मोफत उपलब्ध करून देण्याची सरकारची तयारी आहे. १८ ते ५९ वयोगटातील लोकांना ही सुविधा सरकारी लसीकरण केंद्रात मिळू शकते.
यासंदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जुलैपासून विशेष मोहिमेअंतर्गत ही सुविधा दिली जाणार आहे. ही मोहीम ७५ दिवस चालणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या अंतर्गत लोकांना पूर्वी दिलेल्या दोन लसींच्या डोसप्रमाणेच सरकारी केंद्रांवर जाऊन बूस्टर डोस मिळू शकेल. काही काळापासून कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत आहे आणि त्यामुळे सरकारने लोकांना बूस्टर डोस घेण्याचे आवाहन केले आहे.
पूर्वीच्या दोन डोसप्रमाणे बुस्टर डोस मोफत देण्यात यावा, अशी मागणी होत होती. दरम्यान, सरकारने आता ही लस मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 दिवसांची ही विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.
आतापर्यंत, 18 ते 59 वयोगटातील 77 कोटी लोकांपैकी फक्त एक टक्का लोकांना बूस्टर डोस मिळाला आहे. अशा परिस्थितीत मोफत लसीकरणाच्या पुढाकाराने या आकड्यात मोठी वाढ होईल आणि लोक सरकारी केंद्रांवर जाऊन संरक्षणासाठी बूस्टर डोस घेऊ शकतील असा प्रशासनाला विश्वास वाटतो.
ICMR आणि इतर जागतिक संस्थांच्या अभ्यासानुसार, दोन डोसद्वारे विकसित प्रतिकारशक्ती, त्याचा प्रभाव 6 महिने टिकतो. पण त्यानंतर पुन्हा एकदा बूस्टर डोसची गरज आहे. त्यामुळे सरकारने १८ ते ५९ वयोगटातील लोकांना मोफत बुस्टर डोस देण्याचा निर्णय घेतला आहे.