Yoga Day शिरूर : आयुर्वेद आणि योगा ही आरोग्यासाठी मिळालेली देणगी आहे. (Yoga Day) दोन वर्षात कोरोना महामारीत आयुर्वेद व योगा या दोन गोष्टींचे महत्व सर्वांना पटलेले आहे. (Yoga Day) त्यामुळे अनेक जणांनी योगा प्राणायामची सवय जोडून घेतलेली पहावयास मिळते. (Yoga Day)
योगा आणि प्राणायाम या दोन गोष्टींमुळे अनेक आजारांना दूर ठेवता येते. काही आजारांना नियंत्रणात आणता येते. अनेकांनी योगा आणि प्राणायामच्या माध्यमातून मधुमेहावर नियंत्रण मिळवले आहे. वंशपरंपरेने मधुमेहाचा विकार बहुतेक घरांमध्ये असतो. त्यातून बदललेली जीवनशैली याचा परिणाम देखिल मधुमेह होण्यास कारणीभूत ठरतो.
किडनियंत्रणासाठी वापरलेली किटकनाशके यामुळे अन्न धान्य, फळे, पालेभाज्या यांचा जेवनात झालेला समावेश खऱ्या अर्थाने मधुमेह सारखे आजार होण्यास कारणीभूत ठरत आहे. शेतकरी देखील कमी वेळात भरघोस पिक घेण्याकडे वळाला आहे. त्यातून कर्करोगाचा अधिकाअधिक प्रसार होऊ लागला आहे. शहरात यामुळे कर्करोगाचे प्रमाण जास्त प्रमाणात आढळते.
सेंद्रिय शेतीतून परसबाग तयार करा या बाबत अनेक वेळा कृषी विभागातून सल्ले मिळू लागले आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी घरच्या कुटूंबाकरिता परसबाग सुरू केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कुटूंबापूरत्या पालेभाज्या तयार होऊ लागल्या आहेत. मात्र बाजारपेठेत आजही मोठ्या प्रमाणात रासायनीक खतांचा वापर असलेल्या पालेभाज्या, फळे येऊ लागली आहेत. त्यातून वेगवेगळ्या रोगांचा प्रसार होऊ लागला आहे.
यावर मात करण्यासाठी योगा आणि प्राणायाम नित्य नियमाने करणे गरजेचे आहे. नियमीत व्यायामामुळे चरबीचे प्रमाण नियंत्रीत राहते. ह्रदय व फुफुसाची कार्यक्षमता वाढते. रोगप्रतिकार क्षमता वाढते. कोलेस्ट्रॅाल कमी होतो. मानसीक तणाव कमी होतो. व मन प्रसन्न होते. स्मरणशक्ती सुधारते. झोप लागते. आत्मविश्वास वाढतो. आळस नाहिसा होतो. उच्च रक्तदाब मधुमेह विकार, लठ्ठपणा या सारख्या विकारांपासून दूर राहण्यास मदत होते. असा अनुभव अनेकांना योगा व प्राणायाम मधून मिळू लागला आहे.
मी गेले कित्येक वर्षापासून योगा व प्राणायम नियमितपणे करत आहे. डोंगरमाथ्यांवर चढणे अथवा आठवड्यातून एकदा तरी निसर्गाच्या सानिध्यात जाऊन मोकळी हवा घेने व रोज चालण्याचा व्यायाम करतो. आपल्याला मिळालेले जीवन अमुल्य आहे. या जीवनाची, आरोग्याची जपणूक चांगल्या पद्धतीने करण्याची जबाबदारी आपलीच आहे. आपल्या आरोग्याची काळजी आपनच घेतली पाहिजे. धकाधकीच्या जीवनामध्ये मानसिक व शारीरीक दृष्ट्या तदुंरूस्त राहण्यासाठी योगासन व प्राणायाम यासारखा दुसरा पर्याय नाही. प्रत्येकाने आपल्या कामातून वेळ काढून प्राणायाम व योगा करावा.
सुनिल जाधव
(पर्यावरण व पक्षीप्रेमी -नारायणगाव)