पुणे प्राईम न्यूज डेस्क: आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाचे काहीना काहीतरी कार्य असते. जर सर्व अवयव एकदम तंदुरूस्त असतील तर अनेक समस्यांपासून दूर राहता येतं. मात्र, जर यामध्ये थोडाजरी बदल दिसला की काही समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्यापैकीच एक म्हणजे डोळे पिवळे होणे. डोळ्यांमधील पिवळेपणा हा काही आजारांचं लक्षण असू शकतो.
डोळ्यांद्वारे अनेक रोग/आजार ओळखले जाऊ शकतात. पिवळे डोळे फक्त एकच नाही तर अनेक रोग दर्शवतात. डोळ्यांचा पांढरा भाग हलका पिवळा होऊ लागला तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. पिवळे डोळे हे काविळीसह अनेक आजारांचे लक्षण असू शकते. डोळे पिवळे होणे हे हिपॅटायटीसचे लक्षण असू शकते. हिपॅटायटीसमध्ये डोळे पिवळे पडतात, कारण या आजारामुळे यकृताला सूज येते. हिपॅटायटीस यकृताचे नुकसान करते, ज्यामुळे ते बिलीरुबिन फिल्टर करू शकत नाही. त्यामुळे काविळीसारखे आजार होऊ शकतो.
पिवळे डोळे देखील सिरोसिसचे लक्षण असू शकते. जेव्हा यकृताच्या पेशी खराब होतात तेव्हा सिरोसिस होतो. हे हळूहळू होते, या आजारात यकृताचा आकार कमी होऊ लागतो. याशिवाय यकृताचा मऊपणा कमी होऊ लागतो. जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने सिरोसिस होतो. जर तुमचे डोळे बऱ्याच काळापासून पिवळे असतील तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरकडे जाऊन उपचार करून घ्यावेत. पिवळे डोळे हे देखील मलेरियाचे लक्षण आहे. मलेरियामुळे डोळ्यांचा रंगही पिवळा होतो. डोळ्यांच्या पिवळ्यापणाकडे कधीही दुर्लक्ष करू नये.