सागर जगदाळे
भिगवण: जागतिक हृदय दिवस तक्रारवाडी येथील आरोग्य उपकेंद्रात आज गुरुवारी (ता.२९) मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे. या वेळी उपकेंद्रामध्ये ५३ जणांना उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्यात आली.
हृदयाच्या आजारामुळे वाढणारा मृत्यू दर कमी करण्यासाठी जागतिक हृदय दिवस साजरा केला जातो. हृदयाची योग्य काळजी न घेतल्याने ह्रदय रोग होतात म्हणून ह्रदयरोग होण्याची कारणे व हृदय रोग होऊ नये यासाठी पुढील काळजी घेण्याचे आवाहन तक्रारवाडी उपकेंद्रामार्फ़त करण्यात आले.
हृदय रोगाची कारणे -तंबाखू सेवन,लठ्ठपणा,मध्यपान करणे,धमनी रोग,अनुवंशिकता,उच्च रक्तदाब असंतुलित आहार,मधुमेह,शरीर निष्क्रियता या कारणांमुळे ह्रदयरोग जडण्याची शक्यता असते.असंसर्गजन्य रोगाची लक्षणे प्राथमिक स्तरावर ती दिसत नाही बचावासाठी तीस वर्षावरील व्यक्तींनी नियमित ब्लड प्रेशर मधुमेह इत्यादींसारख्या तपासणी व औषध उपचार करावे. या सर्व सुविधा तक्रारवाडी उपकेंद्रामध्ये मोफत आहेत याचा लाभ नागरिकांनी घ्यावा असेही आवाहन केले.
ह्रदय विकाराची लक्षणे म्हणजे छातीत दुखणे , हृदयात धडधड होणे किंवा चक्कर येणे, घाम येणे , पायऱ्या चढताना धाप लागणे किंवा लगेच बेशुद्ध होणे,खांदा किंवा हातामध्ये दुखणे ,काम केल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होणे या पैकी कोणतेही लक्षण आढळून आल्यास, आपल्या जवळच्या उपकेंद्र किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी संपर्क साधावा.
दरम्यान,”सकस आहार योग्य व्यायाम देईल सुदृढ हृदयाची साथ”हृदय सुदृढ ठेवण्यासाठी घ्यावयाची काळजी म्हणजे मिठाचे प्रमाण संतुलित ठेवावे ,धूम्रपान टाळावे, ताणतणावांना बळी पडू नये नियमित व्यायाम करावा, ताजी फळे भाजीपाला खावेत, पुरेशी झोप घ्यावी.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तक्रारवाडी उपकेंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. मृदुला जगताप, आरोग्य सेविका -प्रिया भोसले आशा सेविका शोभा काळंगे,ज्योती जगताप,भारती बंडगर,सीमा मारकड, सविता देवकाते,मनीषा देवकाते यांनी प्रयत्न केले.