( Women’s Day Special ) लोणी काळभोर, (पुणे) : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने (Women’s Day Special) महिलांना त्यांच्या आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी आणि त्यांच्या दैनंदिन जीवनातील एक आवश्यक पैलू म्हणून फिटनेसला प्रोत्साहन देण्यासाठी, लोणी काळभोर (ता. हवेली) येथील विश्वराज हॉस्पिटलच्या (Vishwraj Hospital) वतीने २ किमी वॉकेथॉनचे (रॅलीचे) आयोजन करण्यात आले होते.
महिला दिनाची संकल्पना, “स्त्री पुरुष समानतेची जोपासना”…
महिला दिनाची संकल्पना, “स्त्री पुरुष समानतेची जोपासना” ही आहे. समाजात स्त्री-पुरुष समानतेला अधिकाधिक वृद्धिंगत करण्यावर भर देण्याचे उद्दिष्ट आहे. विश्वराज हॉस्पिटल महिलांना त्यांच्या आरोग्य आणि निरोगीपणाला प्राधान्य देण्यासाठी प्रोस्ताहित करीत आहे.
विश्वराज हॉस्पिटलच्या वतीने शनिवारी (ता. ११) अकरा वाजण्याच्या सुमारास विश्वराज हेल्थ-फॉर-हर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वराज हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉ. अदिती कराड, विश्वराज हॉस्पिटलचे युनिट हेड सुधीर चंद्र उत्तम हे कार्यक्रम संयोजक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
विश्वराज हॉस्पिटल येथे ११ मार्च ते ११ एप्रिल २०२३ या कालावधीत महिलांना मोफत तपासणी देखील देण्यात येणार आहे. मोफत आरोग्य तपासणीमध्ये एचबी, बीएसएल, बीएमआय आणि स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला यांचा समावेश असेल. पहिल्या ५० महिला रुग्णांची मोफत सोनोग्राफी/मॅमोग्राफी करण्यात येणार आहे तसेच पुढील ५० महिला रुग्णांना सदर तपासणींवरती ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे.
दरम्यान, विश्वराज हेल्थ-फॉर-हर इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी, इच्छुक महिला विश्वराज हॉस्पिटलमध्ये विनामूल्य नोंदणी करू शकतात. हा कार्यक्रम सर्व महिलांसाठी खुला आहे. तरी अधिकाधिक महिलांनी आपल्या मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटलमार्फत करण्यात येत आहे.