युनुस तांबोळी
Woman dies during family planning surgery : शिरूर : टाकळी हाजी ( ता. शिरूर ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामधे कुंटुब नियोजन शस्त्रक्रीया करताना एका महिलेचा दुर्देवी मृत्यु झाल्यांची घटना घडली आहे.
शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील घटना
टाकळी हाजी ( ता. शिरूर ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शस्त्रक्रिया सुरु असताना रेखा अर्जुन हिलाळ (वय २८ ) असे दुर्देवी मृत्यू झाला. या निधनाने महीला वर्गात तिव्र नाराजी व्यक्त केली जात असुन, या महिलेच्या मृत्युची सखोल चौकशी करण्याची मागणी जिल्हा परीषद सदस्या सुनिता गावडे व पंचायत समितीचे सदस्य डॉ सुभाष पोकळे यांनी केली आहे.(Woman dies during family planning surgery)
या बाबत टाकळी हाजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैदयकीय अधिकारी डॉ प्रियांका घुगे यांनी सांगितले की, येथे टाकळी हाजी केंद्रातील ४२ तर कवठे केंद्रातील ३८ अश्या ८० महीला कुंटुब नियोजन शस्त्रक्रीयेसाठी आल्या होत्या . डॉ. शिवाजी गजरे यांनी शस्त्रक्रीया केल्या..(Woman dies during family planning surgery)
रेखा हिलाळ ही कवठे येमाई प्रार्थमिक आरोग्य केंद्रामधील रूग्ण असुन, त्यांची सर्व प्रकारची तपासणी केल्यानंतर त्यांना शस्त्रक्रिया टेबलवर घेतले होते. .(Woman dies during family planning surgery) त्यावेळी त्यांची तब्बेत एकदम ठणठणीत होती. मात्र शस्त्रक्रीया सुरु झाल्यानंतर त्या घाबरल्या त्यांना त्रास होऊ लागल्याने त्याना खाली घेतले. व पुढील उपचारासाठी शिरूरला पाठविले. मात्र त्या पुर्वीच त्यांचा मृत्यु झाला होता.
रेखा हिलाळ यांना दोन मुले आहेत. त्यांच्या मृत्युमुळे आरोग्य खात्यांच्या सेवेबद्दल प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे..(Woman dies during family planning surgery) विशेष म्हणने रेखा हिलाळ या कवठे येमाई आरोग्य केंद्रामधील असुन तेथील ३८ महीला शस्त्रक्रीयेसाठी रुग्नवाहीकेने टाकळी हाजी येथे आणण्यात आल्या होत्या. मात्र कवठे येमाई येथील दोन पैकी एकही वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंदाकडे फिरकला सुद्धा नाही.
कवठे येमाई प्राथमिक आरोग्य केंद्रात रूग्णांबाबत बेफिकीरी
कवठे येमाई प्राथमिक आरोग्य केंद्रात रूग्णांबाबत बेफिकरीपणा आढळून येत आहे. या ठिकाणी जखमेची मलमपट्टी करायला गेलेल्या महिलेला तुम्ही घरीच मलमपट्टी करा. हे आरोग्य केंद्र जंतूचे माहेरघर आहे. .(Woman dies during family planning surgery) त्यापेक्षा घरीच निर्जतूकरण करून मलमपट्टी करा. असे सांगून कामाची टाळाटाळ करत असल्याचे आढळले. त्यावर वैद्यकिय अधिकारी देखील लक्ष देत नसल्याचे व कर्मचाऱ्यांना पाठिशी घालत असल्याची चर्चा या ठिकाणी जोरदार आहे. तातडीने येथील परीस्थीतीचा आढावा जिल्हा आरोग्य केंद्राने घ्यावा. अशी मागणी रूग्णांकडून केली जात आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
शिरुर तालूका प्राथमीक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने पदोन्नती झालेल्या अधिकाऱ्यांचे सत्कार…!