पुणे : राज्यात विशेषत: मुंबईत काही दिवसांपासून गोवर आजाराची साथ पसरल्याने चिंता वाढली आहे. राज्य सरकारचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. केंद्र सरकारने याबाबत गंभीर दखल घेतली आहे. सध्या लहान मुलांमधील गोवरचा आजार वाढत आहे.
गोवरच्या विषाणूच्या संपर्कात आल्यानंतर ४-५ दिवसांनी मुलामध्ये गोवरची लक्षणे दिसू शकतात. हा एक गंभीर रोग आहे, म्हणून आपण त्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.
गोवर संक्रमित व्यक्तीच्या श्लेष्मा (बलगम) किंवा लाळेच्या संपर्कातून पसरतो. एवढेच नाही तर बाधित व्यक्तीच्या खोकल्यामुळे किंवा शिंकल्याने गोवरचा आजार हवेत पसरू शकतो, ज्यामुळे दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग होऊ शकतो.
गोवर हा विषाणूजन्य संसर्ग आहे. या आजाराविषयी माहिती जाणून घ्या.गोवर आजाराची यापैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
डोळे लाल होणे-
प्रदूषण, धूर आणि मातीमुळे डोळे लाल होऊ शकतात. परंतु डोळ्यांत बराच काळ लालसरपणा येत असेल तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा. या स्थितीत डोळे देखील प्रकाशासाठी संवेदनशील होतात. लहान मुलांचे डोळे लाल होणे हे देखील गोवर रोगाचे लक्षण असू शकते.
स्नायू दुखणे-
मुलांमध्ये स्नायू दुखणे सामान्य नसते. अशा परिस्थितीत, जर तुमच्या मुलाच्या शरीरात बर्याच काळापासून वेदना होत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
खोकला आणि ताप-
जर मुलाला बराच वेळ खोकला आणि ताप येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. या स्थितीत १०४°d पर्यंत ताप येऊ शकतो. गोवरचा आजार असलेल्या कोणत्याही मुलामध्ये खोकला आणि ताप यासारखी लक्षणे दिसू शकतात.
त्वचेवर पुरळ-
त्वचेवर पुरळ, खाज सुटणे आणि सूज आल्यासारखे वाटू शकते. याशिवाय घसा खवखवणे, तोंडात पांढरे डाग येणे ही देखील गोवरची लक्षणे आहेत. गोवर हा आजार प्रथम डोक्यावर होतो, त्यानंतर तो हळूहळू शरीराच्या इतर भागातही पसरतो.त्वचेवर पुरळ येणे हे गोवरचे एक सामान्य लक्षण आहे.