winter eye care tips : सध्या थंडी अर्थात हिवाळा ऋतू सुरु झाला आहे. या हिवाळ्यात अनेक गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. अन्यथा आरोग्यासाठी अनेकप्रकारे आव्हानात्मक बनू शकते. थंडीमुळे श्वसनाच्या संसर्गाबरोबरच त्वचेच्या समस्या, सांधेदुखी आणि हृदयाच्या समस्याही वाढतात. या हवामानामुळे तुमच्या डोळ्यांच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.
डोळे कोरडे पडल्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू लागतात. डोळ्यांमध्ये जळजळ होणे किंवा खाज येणे यांसारख्या समस्या होणे सामान्य आहे. याशिवाय, तुम्हाला प्रकाशाची संवेदनशीलता, डोळ्यांमध्ये काहीतरी जाणवणे, रात्री गाडी चालवण्यास त्रास होणे आणि अंधुक दृष्टी येण्याचा अनुभव येऊ शकतो. असे असल्यास वैद्यकीय उपचार घेण्याची गरज आहे. ज्या लोकांना डोळे कोरडे पडण्याची समस्या आहे त्यांनी यावर वेळीच उपचार करून घ्यावेत. या डोळ्यांच्या समस्येवर योग्य उपचार न केल्यास, डोळ्यांच्या संसर्गाचा धोका लक्षणीय वाढतो.
कालांतराने तुमच्या डोळ्यांच्या पृष्ठभागाला इजा होऊ शकते आणि गंभीर प्रकरणांमध्ये डोळ्यांची जळजळ, कॉर्नियल पृष्ठभागाची झीज, कॉर्नियल अल्सर आणि दृष्टी कमी होऊ शकते. कोरड्या डोळ्यांच्या समस्येमुळे, तुम्हाला दैनंदिन कामे करणे कठीण होते, यामुळे जीवनाच्या गुणवत्तेवर देखील परिणाम होऊ शकतो. म्हणूनच, फोन-लॅपटॉपसारख्या डिजिटल स्क्रीनचा वापर कमीत कमी करा. पुरेशी झोप घ्या जेणेकरून तुमच्या डोळ्यांना आराम मिळेल.