भारतीय अन्न पदार्थांमध्ये चव वाढवणारा घटक म्हणजे लसूण. लसूण खाण्याचे अनेक फायदे आहेत. आरोग्यासाठीही लसूण खूप फायदेशीर मानला जातो.
लसूण खाण्याचे फायदे:
लसूण आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करतो. त्यात कर्करोगाशी लढण्याचे वैद्यकीय गुणधर्म समाविष्ट आहेत. तज्ञांच्या मते लसणामध्ये अनेक बायोएक्टिव्ह ऑर्गेनोसल्फर संयुगे आढळतात. यामध्ये अॅलिसिन आढळते. अॅलिसिनमध्ये कर्करोगाशी लढण्याची शक्ती असते. लसणामध्ये आढळणारे अॅलिसिन हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. पचनक्रिया सुधारण्यासाठी लसूण फायदेशीर आहे.
तसेच लसूणामध्ये प्रतिजैविके असतात. यामुळे तो बॅक्टेरिया आणि विषाणूजन्य संसर्गापासून संरक्षण करतो. आयुर्वेदानुसार, सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाणे शरीरासाठी खूप फायदेशीर मानले जाते. दररोज सकाळी लसूण खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि बॅक्टेरिया, विषाणू आणि बुरशीपासून बचाव होतो.
(टीप : वरील सर्व माहिती ही वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. पुणे प्राईम न्यूज यातून कोणताही दावा करत नाही.)