Pune Prime News : आपण सर्वचजण आपल्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष काळजी घेत असतो. अनेकजण असेही आहेत कोणत्याही आजाराची थोडी जरी लक्षणे आढळली तर लगेच उपचार सुरु करतात. तर काही अगदी दुर्लक्ष करतात. पण तुमचं हेच दुर्लक्ष करणं काहीवेळा तुमच्या जीवावर बेतू शकतं. त्यापैकी एक आजार म्हणजे न्यूमोनिया. हा आजार जरी सामान्य वाटत असला तरी योग्यवेळी उपचार न घेतल्यास जीवघेणाही ठरू शकतो.
न्यूमोनिया हा एकप्रकारचा श्वसनमार्गाचा आजार आहे. विषाणू, जीवाणू किंवा बुरशी संसर्गामुळे फुफ्फुसांमध्ये संसर्ग होतो. न्यूमोनियाचा संसर्ग सौम्य किंवा काही प्रकरणांमध्ये जीवघेणा ठरतो. न्यूमोनियाचे निदान हे सामान्यत: शारीरिक तपासणी (तुमच्या श्वासोच्छवासाचा आवाज ऐकण्यासाठी) आणि एक्स-रेद्वारे केले जाऊ शकते. तसेच लक्षणांच्या तीव्रतेवरही अवलंबून असते.
न्यूमोनिया झाल्यावर नेमकं होतं काय?
जर एखाद्याला न्यूमोनिया झाल्यास संबंधितांच्या श्वासोच्छवासात अडथळा निर्माण होतो. जोरजोरात आणि कमी श्वास घेणं होऊ शकतं. हृदयाच्या ठोक्यांचं प्रमाणही वाढत असतं. तसेच ताप, अंगात थंडी भरणं आणि खूप घाम येणं. कफ, छातीत दुखणं, नॉशिया, उलट्या होणं किंवा डायरिया असे न्यूमोनिया झाल्यावर होऊ शकतं.
न्यूमोनिया झाल्यावर काय करावं?
रुग्णाला गंभीर संसर्ग किंवा जळजळ झाल्याचा संशय असल्यास मूल्यांकन करण्यासाठी ही चाचणी आवश्यक असू शकते. न्यूमोनियाग्रस्त रुग्णांनी जास्तीत जास्त आराम आणि शरीरात पाण्याचं प्रमाण चांगलं ठेवलं तर फायदा होतो.