आपल्यापैकी अनेकांना चहा अथवा कॉफी पिण्याची सवय असेल. चहा, कॉफी प्यायल्याने ताजतवाने, फ्रेश वाटते. त्यामुळे बहुतांश जण हे पिताना दिसतात. याची सवयही अनेकांना असते. पण हाच चहा तुमच्या शरीरासाठी लाभदायक असतो की हानिकारक याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
मर्यादित प्रमाणात चहा पिणे हानिकारक आहे असे म्हणता येणार नाही. जर तुम्ही दूध आणि साखर नसलेला आणि ज्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा मसाले असेल तर त्याचे बरेच फायदे देखील होऊ शकतात. पण जर तुम्ही दिवसातून 4-5 वेळा दुधासोबत चहा पीत असाल तर नक्कीच काही दीर्घकालीन हानी होण्याचा धोका आहे. महिनाभर चहा सोडून दिल्यास शरीरात आरोग्यदायी बदल होऊ शकतात. 30 दिवसांसाठी कॅफिनचे सेवन कमी केल्याने चांगली झोप, कमी चिंता आणि पाचक आरोग्यामध्ये सुधारणा होऊ शकते.
चहामध्ये नैसर्गिकरित्या कॅफिन असते, त्यामुळे त्याचे जास्त सेवन केल्याने तुमचे झोपेचे चक्र बिघडू शकते. जास्त प्रमाणात कॅफीन सेवन केल्याने मेलाटोनिन हार्मोनचे उत्पादन व्यत्यय आणू शकते. थकवा, स्मरणशक्ती कमी होणे, झोप न लागणे याशिवाय लठ्ठपणा, रक्तातील साखर नियंत्रणात न राहणे यासारख्या समस्याही वाढू शकतात. त्यामुळे चहाचे प्रमाण कमी राहील याची खात्री नक्की करा.