Weight Loss : आजकाल वाढत्या वजनामुळे अनेक लोक त्रस्त आहेत. बदलत गेलेली जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकलेल्या सवयी, यामुळे वजन वाढण्याची समस्या पुढे येत आहे. त्यामुळे व्यक्तीला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार अशा अनेक आजारांनी घेरलेले असतात. अशा परिस्थितीत याजारातून किंवा वाढत जाणार वजन यातून सुटका सोपे आहे अस म्हणता येणार नाही, पण ते अशक्यही नाही.
चरबी झपाट्याने कमी होईल…
लठ्ठपणामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या समोर येऊ शकतात. शरीरातील चरबी वाढल्यामुळे आपल्याला अनेक आजार होऊ शकतात. त्यामुळे तुमचे वजन नियंत्रित ठेवणे महत्त्वाचे आहे. यामुळे तुम्ही निरोगी राहण्यास मदत होईल आणि तुमच्या शरीराबद्दल सकारात्मक विचार देखील कराल. अशा परिस्थितीत तुम्ही काही पेयांच्या मदतीने तुमचे वजन कमी करू शकता. तसेच त्यासाठी तुम्हा काही गोष्टी कराव्या लागतील. त्यामुळे तुमची हट्टी चरबी झपाट्याने कमी होईल. तर त्याबद्दल जाणून घेऊया.
१) दालचिनी पाणी
एक ग्लास पाण्यात एक ते दीड इंच दालचिनीचा तुकडा टाकून रात्रभर ठेवून द्या. सकाळी उकडलेले दालचिनीचे पाणी रात्रभर पिल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते आणि चयापचय वाढतो, जे वजन कमी करण्यास तुम्हाला मदत करते.
२) आलं पाणी
आल्याचा एक छोटा तुकडा आणि दालचिनीचा तुकडा एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा आणि ते सकाळी उकळून घ्या आणि लिंबाचा रस आणि मधासह चहासारखे सेवन करा. सकाळी रिकाम्या पोटी आल्याचे पाणी प्यायल्याने वजन कमी करणे सोपे होते.
3) जिरं पाणी
एक चमचा जिरे एका ग्लास पाण्यात भिजवून सकाळी उकळून घ्या, त्यात लिंबाचा रस घालून चहाप्रमाणे प्या. वजन कमी करण्यासाठी जिरे पाणी हा नैसर्गिक उपाय आहे. हे पाणी सकाळी प्यायल्याने चयापचय वाढतो, ज्यामुळे पचन सुधारते आणि सूज कमी होण्यास मदत होते.
4) मेथी पाणी
एक चमचा मेथीचे दाणे एका ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवून द्या आणि सकाळी ते उकळा. नंतर चहासारखे प्या. मेथीचे पाणी रात्रभर भिजवल्याने पोट भरल्याची भावना येते, ज्यामुळे भूक कमी होते आणि वजन कमी करणे सोपे होते.