Weight Loss : पुणे : प्रत्येकाला आपण सुंदर दिसाव अस वाटत. चेहऱ्यावर तेज, स्लिम-ट्रिम, लांबसडक केस, निरोगी आरोग्य, आपण जगाव असं वाटत. मात्र हेही लक्षात घेणे गरजेचे आहे की, यासर्व गोष्टी सहजासहजी मिळू शकत नाहीत. त्यासाठी शारिरीक हलचालींचा महत्त्वाचा भाग असतो. वजन कमी करण्यासाठी रोज कमीत कमी ४ हजार पाऊलं चालायला हवीत.
वयानुसार किती चालनं गरजेच
५ ते १८ वय वर्ष वयोगटातील लोकांनी रोज १३ हजार पाऊलं चालायला हवीत. १९ ते ४० वयोगटातील पुरूष आणि महिलांनी १४ हजारांपेक्षा जास्त पाऊले चालावे. ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनी रोज १२ हजार पाऊलं चालावे. ५० पेक्षा जास्त वय असलेल्यांनी कमीत कमी १० हजार पाऊलं चालायला हवं. ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांनी ७ हजार पाऊलं चालायला हवी, असे तज्ञांनी सांगितले आहे.
अशा पद्धतीने चालल्यास होईल फायदा
चालताना शरीराच सरळ असावे. हातांच्या मुठा बंद नसाव्यात, छातीचा भाग सरळ ठेवून खांदे वर खाली करत पायी चाला, पायी चालताना हातांचा कोपरा ९० अंशात वाकवा. पायी चालताना डोकं सरळ ठेवा. पाठ आणि खांदे वाकवू नका सरळ चालण्याचा प्रयत्न करा. पाय जमिनीवर खाली ठेवून चाला. चालताना खांद्याचीही थोडी-फार हालचाल करा. चालताना लोक खूप लवकर बोअर होतात. कोणाशीही बोलत-बोलत जास्तवेळ वॉक करत राहतात. फक्त १० ते १५ मिनिटेच वॉक करा. अन्यथा त्यांना थकवा येऊ शकता. पण रोज कमीत कमी ३० मिनिटांचा वॉक गरजेचा असतो.
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात मेंटेन राहू इच्छित असाल आणि व्यायामासाठी फार वेळ मिळत नसेल तर नियमित चालून तुम्ही मेंटेन राहू शकता. एका दिवसात किती चालायला हवं हे सुद्धा आता तुम्हाला समजलं असेल. निरोगी दीर्घायुष्यासाठी व्यायाम करणं फायदेशीर मानलं जातं. हार्वर्ड युनिव्हर्सिटीत करण्यात आलेल्या संशोधनानुसार आणि जेएएमए इंटरनल मेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासानुसार मृत्यूचा धोका कमी करण्यासाठी रोज कमीत कमी ४ हजार पाऊलं चालायला हवीत. जवळपास ७,५०० पाऊलं चालणं आणि इंटेस व्यायाम गरजेचा असतो. हेल्दी आणि फिट राहण्यासाठी कमीत कमी २० मिनिटं व्यायाम करण्याचे टार्गेट असायला हवं.