आपल्यापैकी अनेकजण वाढलेल्या पोटाच्या समस्येने त्रस्त असतील. तुम्हीही दिवसातून एकदा तरी भात खात असाल. त्यातही पांढरा भात असे ते खाणं कमी करा. कारण, पांढऱ्या तांदळाची चव चांगली लागते, पण त्यात खूप कमी पोषण आणि जास्त कार्बोहायड्रेट असतात. जे तुमच्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरत नाहीत.
पांढऱ्या तांदळाचा भात खाण्याऐवजी ब्राऊन राईस हा उत्तम पर्याय ठरू शकेल. यामध्ये पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत जास्त फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. हे पचनासाठी चांगले असते आणि वजन कमी करण्यास देखील मदत करते. क्विनोआ हे एकप्रकारचे धान्य आहे, ज्यामध्ये प्रथिने, फायबर आणि अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. हे ग्लूटेन-मुक्त देखील आहे, म्हणून गव्हाची ऍलर्जी असलेले लोक देखील ते खाऊ शकतात.
तसेच बार्लीदेखील प्रभावी ठरू शकते. कारण, यामध्ये भरपूर फायबर, व्हिटॅमिन बी आणि खनिजे असतात. हे पचनासाठी चांगले असते आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते. बाजरी हे पोषक तत्वांनी युक्त असे धान्य आहे, ज्यामध्ये फायबर, प्रोटीन, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. हे ग्लूटेन-मुक्त देखील आहे. त्यामुळे या पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो.