Health News : युरिक ऍसिडचा त्रास कदाचित काही लोकांनाच जाणवत असतो. थॉयरॉईड, मधुमेह, हार्ट ब्लॉकेज् याशिवाय युरिक अॅसिडसारखे गंभीर आजारही आजकाल सामान्य झाले आहेत. या प्रकारात हात-पायांच्या सांध्यांमध्ये सतत वेदना होतात. त्यामुळे चालण्यास त्रास होत असतो. पण अशा काही वनस्पती आहेत त्यांच्या पानांचा रस गुणकारी ठरतो.
युरिक ऍसिडच्या समस्येवर निलगिरीची वनस्पती एखाद्या औषधापेक्षा कमी नाही. निलगिरीची फक्त चार पाने रोज सकाळी त्याचा काढा बनवून घ्यायचा आहे. यामुळे युरिक अॅसिडची समस्या दूर होऊ शकते. या आयुर्वेदिक औषधाचे तुम्ही आठवडाभर सतत सेवन केल्यास तुम्हाला नक्कीच फायदा जाणवू शकतो.
हे पान रोज सकाळी चघळले तरी त्याचे फायदे होतात. फक्त 4 ते 5 पाने खावीत. यापेक्षा जास्त तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असेल. निलगिरीच्या पानांमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ, रेचक, अँटीऑक्सिडंट, अँटीकॉनव्हलसंट, हायपोग्लायसेमिक आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात.
निलगिरीमुळे ‘दशमुलारिष्ट’ नावाच्या हर्बल फॉर्म्युलेशनमधील एक घटक आहेत, ज्याचा उपयोग कोलायटिस, आमांश, अतिसार, पोट फुगणे, ताप, उलट्या आणि पोटशूळ बरे करण्यासाठी केला जातो. या पानांमध्ये अल्कलॉइड निसिंडिन, फ्लेव्होनॉइड्ससारखे फ्लेव्होनॉइड्स, ल्युटोलिन-7-ग्लायकोसाइड, व्हिटॅमिन सी आणि कॅरोटीनसारखे घटक देखील असतात. याचा फायदा युरिक ऍसिडच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी केला जातो.