Health tips : बदलत्या हवामानानुसार आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागते. पण, हवामानातील बदलामुळे काही आजार उद्भवण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यावर भर दिला जातो. पण ही शक्ती वाढवायची असेल तर आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी आज सांगणार आहोत.
रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी, एक ग्लास पाण्यात गिलोय मिसळा आणि उकळवा. हे आपली प्रतिकारशक्ती मजबूत करेल. गिलोयमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. तसेच कडुलिंबाच्या पानांची पेस्ट बनवून गोळ्याच्या स्वरूपात रिकाम्या पोटी खा. हे खाल्ल्यानंतर एक तासांसाठी काहीही खाऊ नका. यात अँटी-बॅक्टेरिया आणि अँटी-फंगल गुणधर्म आहेत जे रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करतात.
दुपारच्या जेवणानंतर रोज गुळ आणि एक चमचे तूप मिसळून खा. या दोन गोष्टी एकत्र खाल्ल्याने तुमची प्रतिकारशक्ती बळकट होते. गुळामध्ये बरेच अँटी-ऑक्सिडंट असतात. या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. अर्धा इंच आले आणि थोडी काळी मिरी पावडर, एक चमचा मध घालून चांगले मिक्स करावे. दररोज सकाळी ते प्यायल्याने तुमची प्रतिकारशक्ती वाढू शकते.