सध्याच्या स्पर्धेच्या युगात आपल्या आरोग्याकडे विशेष असे लक्ष द्यायला जमत नाही. परिणामी, गंभीर आजार बळावू शकतात. त्यात तणाव आणि चिंता हीदेखील सतावू शकते. त्यामुळे काही गोष्टींची काळजी घेतल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकते. त्यात सकाळची सुरुवात पौष्टिक अन्नाने करा.
तुमच्या आहारात विविध रंगांची फळे, भाज्या, रस आणि नट्स यांचा समावेश असला पाहिजे. याने शरीरात आवश्यक पोषक आणि अँटिऑक्सिडंट्स मिळू शकते. हे केवळ मन निरोगी ठेवत नाही तर मूड देखील सकारात्मक बनवते. रात्रभर भिजवलेले बदाम सकाळी रिकाम्या पोटी खा. बदामाच्या सालीमध्ये टॅनिन असते, जे पोषक तत्वांचे शोषण रोखते. साल काढल्यानंतर खाल्लेल्या बदामांमध्ये व्हिटॅमिन ई, फायबर आणि ओमेगा-3 फॅटी ॲसिड मिळते, ज्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते.
तसेच सकाळी लापशी खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेले राहते आणि शरीरातील अनावश्यक घटक निघून जातात. प्रोटीन, फायबर आणि हेल्दी फॅट्सने समृद्ध असलेला नाश्ता तणाव नियंत्रणात प्रभावी ठरतो. त्यामुळे या गोष्टीकडेही लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले आहे.
सूर्यप्रकाश आणि सकाळी चालणे
सकाळी उठल्याबरोबर थोडा वेळ सूर्यप्रकाशात घालवल्याने तुमची मानसिक स्थिती सुधारते. तणाव आणि चिंता दूर करण्यासाठी हे उपयुक्त आहे. मॉर्निंग वॉकमुळे मूड तर चांगला राहतोच पण शरीर तंदुरुस्त राहते.