दैनंदिन जीवनात व्यायामाला विशेष असे महत्त्व आहे. नियमित व्यायाम अनेक आजारांना दूर ठेवण्याचे काम करते. जर तुम्हाला व्यायाम करायला वेळ नसेल तरी चालणे हे अवश्य करावे. कारण, चालण्याचे विशेष असे फायदे आहेत. नियमित चालण्याने हृदयाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होऊ शकते.
तुम्ही दररोज दिवसातून 3 मिनिटे ते 40 मिनिटे चालण्याचा प्रयत्न कराच. 3 मिनिटांच्या चालण्याने बराच वेळ बसल्यामुळे होणारी हानी दूर होऊ शकते. हे चयापचय समस्यांचा धोका कमी करू शकते आणि रक्त परिसंचरण सुधारू शकते. 5 मिनिटांच्या मैदानी चालण्यामुळे ऊर्जेची पातळी वाढू शकते आणि नैसर्गिक प्रकाश आणि ताजी हवेच्या संपर्कामुळे मूड सुधारू शकतो. त्यात निसर्गाच्या सानिध्यात आल्याने अगदी थोड्या काळासाठी, तणाव कमी होऊ शकतो आणि एकूणच मानसिक आरोग्य सुधारू शकतो.
दररोज 5-10 मिनिटे चालणे रक्ताभिसरण सुधारू शकते आणि कालांतराने हृदयाचे आरोग्य काही प्रमाणात का होईना सुधारू शकते. यामुळे तणाव आणि चिंतांपासून आराम मिळण्यास मदत होते, ज्यामुळे त्वरित मानसिक ताजेपणा मिळतो.
रात्री जेवणानंतर 15 मिनिटे चालाच
जेवणानंतर 15 मिनिटे चालणे पचनक्रियेस मदत करते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवते आणि अतिरिक्त कॅलरी बर्न करून वजन स्थिर ठेवण्यास मदत करते. खाल्ल्यानंतर चालणे आळशीपणाची भावना कमी करू शकते आणि मूड सुधारू शकते. त्यामुळे याकडेही लक्ष द्यावे.