दीपक खिलारे
इंदापूर : सूर्या हॉस्पिटल व मेडिकलच्या माध्यमातून जाधव-देशमुख परिवाराचे आरोग्य क्षेत्रातील काम उल्लेखनीय असल्याचे मत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी व्यक्त केले.
रेडणी (ता. इंदापूर) येथे सूर्या मेडिकल अँड जनरल स्टोअर्सच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व शिवव्याख्याते प्रा. नितीन बानुगडे-पाटील उपस्थित होते.
पुढे बोलताना जगदाळे म्हणाले की, सूर्या हॉस्पिटल आणि मेडिकल हे सर्वसामान्य रुग्णाला केंद्रबिंदू मानून काम करत आहे. पैशांअभावी कोणत्याही रुग्णाला औषधोपचारांपासून दूर ठेवले नाही.
रुग्णाला बारामती, इंदापूर, अकलूज या ठिकाणी मिळणाऱ्या सुविधा आता रेडणीत मिळणार असून हे काम कौतुकास्पद असल्याचे जगदाळे यांनी नमूद केले.
यावेळी रेडणी गावचे माजी सरपंच सुभाष पाटील, उपसरपंच प्रफुल्ल चव्हाण, सुरेश खाडे, अमरदीप काळकुटे, सणसरचे तंटामुक्ती अध्यक्ष आबासाहेब निंबाळकर, रेडणीचे तंटामुक्त अध्यक्ष शैलेश तरंगे, नीरा-भीमा कारखान्याचे उपाध्यक्ष कांतीलाल झगडे, संचालक विलासराव वाघमोडे, दत्तू अण्णा सव्वाशे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे इंदापूर तालुकाध्यक्ष निळकंठ मोहिते, उदयसिंह जाधव-देशमुख यांच्यासह पत्रकार व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक डॉ. गौरी जाधव-देशमुख तर आभार प्रदर्शन डॉ. गणेश जाधव-देशमुख यांनी मानले.