आपल्या सर्वांचीच जीभ ही लालसर रंगाची असते. पण हीच लालसर जीभ आपण आजारी आहोत की नाही याचे संकेत देण्याचे काम करते. याची माहिती तुम्हाला कदाचित नसेल. अनेक वैद्यकीय परिस्थितीत जिभेचा आकार, रंग प्रभावित करू शकतात. काही आजारांमध्ये जिभेचा रंग हिरवा, निळा किंवा अगदी काळा देखील होऊ शकतो.
जीभ पिवळी पडणे हे सहसा जीवाणूंच्या वाढीमुळे होते. तोंडात स्वच्छता आणि ओलावा नसणे या दोन्हीमुळे जिभेवर बॅक्टेरियाची वाढ होऊ शकते. एका अभ्यासानुसार, पिवळी जीभ हे मधुमेहाचे लक्षण असू शकते आणि काही प्रकरणांमध्ये ते कावीळचे लक्षण देखील मानले जाते. त्याचप्रमाणे, जिभेचा केशरी रंग देखील लक्ष देण्यासारखे चिन्ह आहे. काही प्रतिजैविक आणि खाद्यपदार्थांमुळे जीभ नारिंगी होते. तर काही प्रकरणांमध्ये ते तोंडाच्या स्वच्छतेमध्ये अडथळा आणण्याचे लक्षण मानले जाते.
जिभेचा रंग हलका गुलाबी ते निळा बदलणे किंवा जिभेवर निळे डाग दिसणे हे गंभीर समस्यांचे लक्षण मानले जाते. साधारणपणे, असा बदल रक्तातील ऑक्सिजनच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. रक्ताचे विकार, रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार, किडनीचे आजार यामुळे जिभेवर असे बदलही तुम्हाला दिसू शकतात.