‘हाय कोलेस्ट्रॉलला ‘सायलेंट किलर’ असेही म्हटले जाते. जेव्हा शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते तेव्हा हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका वाढतो. जेव्हा शरीरात बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू लागते, तेव्हा ते रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ लागते. ज्यामुळे हृदय आणि मेंदूला रक्तप्रवाहात अडथळा येतो. पण आपल्या निसर्गात अशा काही भाज्या आहेत त्याने चांगलाच फायदा होऊ शकतो.
भेंडी हीदेखील फायदेशीर ठरू शकते. भेंडीमध्ये विरघळणारे फायबर, विशेषत: पेक्टिनचे प्रमाण जास्त असते, जे पित्त आम्ल आणि कोलेस्ट्रॉलला आतड्यांमध्ये बांधून, त्यांचे शोषण रोखून कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करू शकते. भेंडीमध्ये म्युसिलेज देखील असते, जो एक जेलसारखा पदार्थ आहे, जो शरीरातील विषारी पदार्थ आणि अतिरिक्त कोलेस्टेरॉल बाहेर काढण्यास मदत करतो.
वांगी गुणकारी मानली जाते. कारण, यामध्ये विरघळणारे फायबर देखील आढळते. जे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. यामध्ये असलेले फायबर आतड्यांमधील कोलेस्ट्रॉलचे शोषण कमी करते, ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. वांग्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स देखील असतात जे रक्तवाहिन्यांना ऑक्सिडेटिव्ह नुकसान होण्यापासून वाचवतात.
ब्रुसेल्स स्प्राउट्समध्ये भरपूर फायबर आणि अँटिऑक्सिडंट असतात, जे रक्तवाहिन्यांमधील जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह नुकसान कमी करून कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात.