Eye Care Tips : वयानुसार आपल्या शरीरात विविध बदल दिसून येतात, ज्यामध्ये डोळ्यांच्या आरोग्याचाही समावेश होतो. वयानुसार डोळ्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. विशेषत: जेव्हा तुम्ही वयाच्या ४० व्या वर्षात प्रवेश करता. तेव्हा डोळ्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो, त्यामुळे डोळ्यांची विशेष काळजी घेतली पाहिजे. चला तर मग जाणून घेऊयात.
डोळ्यांची तपासणी
वयाच्या ४० वर्षांनंतर डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी वेळोवेळी डोळ्यांची तपासणी करून घेणे गरजेचे आहे. यामुळे डोळ्यांमध्ये होणारी कोणतीही समस्या वेळेत ओळखली जाईल आणि भविष्यात तुम्हाला कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही.
पोषक आहार घ्या
आहारात अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा समावेश करा. हे तुमच्या एकंदर आरोग्यासाठी तसेच तुमच्या डोळ्यांसाठी फायदेशीर मानले जाते. व्हिटॅमिन सी, हिरव्या पालेभाज्या आणि मासे, पालक, संत्री यासारख्या गोष्टींचा आहारात समावेश करा.
हायड्रेटेड रहा
डोळे आणि एकूणच आरोग्यासाठी पुरेसे पाणी प्या. पुरेसे पाणी प्यायल्याने डोळ्यांतील कोरडेपणाची समस्या दूर होते, ज्यामुळे डोळ्यांना आराम मिळतो.
धूम्रपान सोडा
धूम्रपान हे अनेक आजारांचे मुख्य कारण आहे. विशेषतः डोळ्यांच्या आरोग्यावर याचा खूप वाईट परिणाम होतो. यामुळे मोतीबिंदू, ऑप्टिक नर्व्ह डॅमेज, दृष्टी कमी होणे आणि अंधत्वाची समस्या वाढते.
स्क्रीन टाइम मॅनेज करा
स्क्रीनकडे जास्त वेळ टक लावून पाहण्याचाही डोळ्यांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. स्क्रीन वेळ कमी करताना, प्रत्येक तासानंतर 20-मिनिटांचा ब्रेक घ्या.