Helth Tips : तोंड येणे ही समस्या काहींना सारखीच सतावत असते. त्यापासून दूर राहण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. मीठाच्या पाण्याने गुळण्या करणे असो वा मधाचे सेवन किंवा तोंडली खाणे यांसारखे घरगुती उपाय करण्याला प्राधान्य दिले जाते. पण याशिवाय असे काही घरगुती उपाय आहेत त्याचा अवलंब केल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो. त्याचीच माहिती आज आपण घेणार आहोत…
तोंड येण्याच्या समस्येवर मध गुणकारी मानला जातो. कोणतीही जखम लवकर बरी करण्यासाठी मध फायदेशीर ठरतं. मधामधील अँटी-मायक्रोबियल गुणामुळे जखम लवकर भरते. यासाठीच तोंड आलेल्या ठिकाणी थेट एक-दोन थेंब मध घेऊन लावावं. दर २-३ तासांनी तोंड आलेल्या ठिकाणी मध लावा. त्याने फायदा होऊ शकतो.
तसेच मीठाच्या पाण्याने गुळण्या करणे हा देखील उपाय मानला जातो. मीठ हे डिसइन्फेक्टंट म्हणून प्रभावी आहे. यासाठी कोमट पाण्यामध्ये चमचाभर मीठ मिसळून दिवसातून दोनदा गुळण्या कराव्यात. मीठातील अँटीबॅक्टेरियल गुणांमुळे मायक्रो-ऑर्गेनिज्मचा प्रतिबंध होऊन तोंड येण्याच्या समस्येपासून आराम मिळू शकतो.
याशिवाय, नारळाचं तेलही उत्तम मानले जाते. तोंडाच्या आरोग्यासाठी नारळाचं तेल ही उपयुक्त ठरतं. नारळाच्या तेलातील अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म तोंडातील अल्सर दूर करण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे. तोंड आल्यावर तोंडामध्ये वेदनाही होतात. लवंगही उपयुक्त ठरू शकते. लवंगमध्ये असलेल्या अंटी-बॅक्टेरियल आणि एनाल्जेसिक गुणांमुळे तोंडातील जखमांचं किटाणूंच्या संसर्गापासून बचाव होतो.