पुणे : सर्दी हा सर्वांचा एक कॉमन हेल्थ प्रॉब्लेम आहे. सर्दी होण्यामागचं कारण म्हणजे बदलतं हवामान, धुळ, मातीची एलर्जी सोबतच असणारी कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती. वातावरणामध्ये थंडावा वाढल्यानंतर काही लोकांना शिंकांचा त्रास सुरु होतो. त्यामुळे त्यांना बराच त्रास होतो. परंतु यावर उपाय म्हणून काही असे घरगुती उपाय आहेत, त्यामुळे शिंकांपासून ताबोडतोब आराम मिळू शकतो. हे उपाय केले तर, शिंकांचा त्रास कमी होतोच पण सर्दीच्या लक्षणापासूनही आराम मिळतो.
वारंवार शिंका येत असतील, तर यामागे एलर्जी सुद्धा एक महत्वाचं कारण असू शकतं. जास्तवेळ एसीमध्ये राहिल्यास ड्राय नोजचा त्रास उद्भवू शकतो. त्यामुळे वारंवार शिंका येतात. सध्या काही असे घरगुती उपाय माहिती करून घेऊया, ज्यामुळे सर्दी आणि शिंकांच्या त्रासापासून आपल्याला अराम मिळेल.
घरगुती उपाय पुढीलप्रमाणे..
- जर तुम्हाला वारंवार शिंका येत असतील किंवा सर्दी झाली तर रात्री झोपण्याआधी वाफ घ्या. सर्दीमुळे नाकला कधीकधी सुज देखील येते. गरम पाण्याच्या वाफेमुळे त्रास कमी होतो. सायनसमुळे जमा झालेला कफही यामुळे निघून जातो. गरम पाण्यात लवंग, लसूनच्या पाकळ्या, मीठ टाका. कारण त्यात एंटी बॅक्टेरियल गुण असतात.
- पाणी उकळवा त्यात आल्याची पूड टाका. त्यात मध मिसळून ते पाणी प्या सर्दी आणि शिंकापासून तुम्हाला मोठा दिलासा मिळेल. आलं आणि गुळाच्या सेवनामुळे सुद्धा सर्दीच्या त्रासापासून सुटका होऊ शकते. आलं कुटून त्याचा रस काढा. त्यात गूळ मिसळून सेवन करा. दिवसात दोनवेळा असं करा, आराम मिळेल.
- डाएटमध्ये हळदी दूधाचा समावेश कार, रोज रात्री कोमट दूधात अर्धा चमचा हळदी टाकून सेवन करा, त्यामुळे सुद्धा शिंकेचा त्रास कमी होण्यास मदत होते. दूधातील एंटीऑक्सीडेंट सर्दी-शिंकापासून बचाव करतात. त्याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढते.