आपण सुंदर दिसावं असं अनेकांना वाटत असतं. त्यानुसार, प्रयत्नही केले जातात. मग काहीना काहीतरी ब्युटी टिप्स फॉलो करणे किंवा ऑनलाईन माहिती घेण्याला बऱ्याचदा प्राधान्य दिलं जातं. पण जर तुमच्या चेहऱ्यावर ब्लॅक हेड्स अर्थात काळे डाग असतील तर तुमच्यासाठी ही माहिती फायद्याची ठरणार आहे. कारण, घरगुती उपाय करून ते कमी करता येऊ शकणार आहेत.
मेथी पावडर हे एक माध्यम ठरू शकते. घशाच्या समस्यापासून आराम मिळवण्यासाठी मेथी पावडरचा वापर केला जातो. पण मेथी पावडर चेहऱ्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे. एक चमचा मेथी पावडर घेऊन त्यात एक चमचा मध टाकून मिक्स करून घ्या. त्यानंतर ही पेस्ट चेहऱ्याला लावा. 10 ते 15 मिनिटं चेहरा सुकल्यानंतर थोडंसं पाणी लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे ब्लॅक हेड्स कमी होतील.
याशिवाय, चेहऱ्यासाठी बेसन आणि हळद फायदेशीर आहे. अर्धा चमचा बेसनमध्ये चिमूटभर हळद आणि मैदा मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यात थोडंसं दूध घाला. दूध घालून त्याची पेस्ट बनवा, ही पेस्ट चेहऱ्यावर लावल्यास फायदा मिळू शकतो. कोरफड ही अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे.
कोरफड त्वचेवरील डाग दूर करण्यासाठी खूप प्रभावी उपाय आहे. त्वचेवर वापरण्यासाठी प्रथम कोरफडीचे पान घ्या आणि ते कापून घ्या आणि त्यातील गर चेहऱ्यावर लावून काही वेळ मसाज करावा. नंतर चेहरा धुतल्यास त्याचा परिणाम दिसून येऊ शकतो.