Stray Dogs : पुणे : भटक्या कुत्र्यांनी एका लहान मुलीवर हल्ला केल्याचा व्हिडिओ सध्या सर्वांच्याच काळजाचा थरकाप उडवत आहे. या मुलीवर अचानक तीन भटके कुत्रे हल्ला करतात. काही कळायच्या आतच तिला खाली पाडतात आणि तिचे लचके तोडतात, असं या व्हिडिओत स्पष्टपणे दिसतं आहे. कुणाच्याही काळजाचा ठोका चुकवणारा आणि थरकाप उडवणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Stray Dogs)
https://www.instagram.com/reel/Ct6K3x1s-JM/?igshid=MTc4MmM1YmI2Ng==
या व्हिडिओतील ही मुलगी भटक्या कुत्र्यांपासून स्वतःला वाचवण्यासाठी पळून जाण्यासाठी धडपडताना दिसत आहे. तीन भटके कुत्रे तिच्या अंगावर झेप घेत तिला खाली पाडतात. त्यानंतर ते कुत्रे तिच्या शरीराचे लचके तोडू लागतात. कुत्र्यांच्या या हल्ल्यामुळे घाबरलेली मुलगी जोरजोरात ओरडू लागते. मात्र, तीन कुत्र्यांनी एकदम हल्ला चढवल्यामुळे ती प्रतिकार करू शकत नाही. कुत्र्यांपुढे तिची एकटीची ताकद तोकडी पडते. मात्र, तरीही जीवाच्या आकांताने ती ओरडत राहते आणि मदतीची याचना करत राहते Stray Dogs)
परिसरातून जाणारी एक महिला मुलीच्या किंकाळ्या ऐकून पुढे येते आणि कुत्र्यांना हाकलून देत या मुलीची सुटका करते. महिलेला पाहून भटके कुत्रे घाबरतात आणि तिथून पळ काढतात. त्यामुळे मुलीचा जीव वाचतो, असं या व्हिडिओत दिसत आहे. महिलेनं वेळेत धाव घेत भटक्या कुत्र्यांना हुसकावल्यामुळेच मुलीचा जीव वाचतो. तरीही ही महिला मदतीला येईपर्यंत कुत्र्यांनी मुलीला जखमी करून तिचे ठिकठिकाणी लचके तोडल्याचे दिसत आहे. (Stray Dogs)
सध्या आपल्या सभोवताली भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे. भटक्या कुत्र्यांची दहशत इतकी वाढली आहे की लोकांना घराबाहेर पडण्यास त्रास होत आहे. अनेक वस्त्यांमध्ये भटक्या कुत्र्यांनी लहान मुलांना चावून जखमी केल्याचे प्रकार घडत आहेत. (Stray Dogs)
भटके कुत्रे हिंसक होण्याची काय आहेत कारणे?
– कुत्रा आणि माणसाचं नातं मैत्रीपूर्ण असल्याचं दिसतं. पण भटक्या कुत्र्यांचा विषय वेगळा आहे. त्यांना अन्नाच्या शोधात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावं लागतं. या खाण्याच्या स्पर्धेत त्यांचा स्वभाव बदलत राहतो. (Stray Dogs)
– ट्रॅफिकचा कर्णकर्कश आवाज, रस्त्यावर कचरा फेकण्याची सर्वसामान्यांची सवय रस्त्यावर चमकणारे दिवे याचा कुत्र्यांवर परिणाम होतो आणि ते आक्रमक होतात.
– भटके कुत्रे गटागटाने फिरत असतात, ते धोकादायक असते.
– कुत्रे जेव्हा कच्चं मांस खातात तेव्हा त्यांच्या जिभेवर याची चव रेंगाळत राहते आणि ते अनियंत्रित होतात.
– कधीकधी तर एखाद्याला घाबरवायचं म्हणून देखील कुत्रे आक्रमक होतात. (Stray Dogs)
– एखाद्या भागावर वर्चस्व मिळवणं आणि सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांमुळे देखील कुत्रे माणसांवर हल्ला करतात.
– कुत्र्यांच्या टेरीटरीमध्ये जेव्हा एखादा माणूस येतो, तेव्हा ते आक्रमक होतात आणि हल्ला चढवतात.
-आपल्या मुलांना कुत्रा चावण्यापासून रोखण्यासाठी काय कराल?
– तुमच्या मुलाला कुत्र्यांभोवती कसे वागावे आणि कुत्रा आक्रमक असल्यास काय करावे, हे तुम्ही शिकवू शकता.
– मुलांना अनोळखी कुत्रे असल्यास त्या वाटेने जाणे टाळण्यास सांगा.
– कुत्र्याला पाळीव करण्यापूर्वी, आपल्या मुलाला कुत्र्याच्या मालकाची परवानगी विचारण्यास शिकवा.
– अशा कुत्र्यांजवळ जाऊ नका, जो खात आहे किंवा त्यांच्या पिल्लांची काळजी घेत आहे.
– कोणत्याही लहान मुलांना कुत्र्यासोबत एकटे सोडू नका.
– तुमच्या मुलाला कुत्र्यासोबत सुरक्षितपणे कसे खेळायचे ते शिकवा. त्यांनी कुत्र्यासोबत टग-ऑफ-वॉर, शेपूट ओढणे किंवा कुस्ती यासारखे आक्रमक खेळ खेळू नयेत. (Stray Dogs)
– मुलांना आक्रमक कुत्र्यापासून शांतपणे दूर जाण्यास सांगा.
– कुत्रा मागे येत असल्यास धावू नये कारण यामुळे कुत्रा त्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर हल्ला करण्याची शक्यता वाढेल.
– कुत्र्यापासून दूर जाणे शक्य नसल्यास मुलाने शांत राहावे, कुत्र्याशी संपर्क टाळावा आणि मुठी मानेखाली आणि कोपर छातीपाशी धरून उभे राहावे.
– कुत्र्याच्या हल्ल्यानंतर तुमच्या मुलांना नुकसानभरपाईचा अधिकार आहे.
– भटक्या कुत्र्याची शक्यतो छेड काढू नका, किंवा तुम्ही त्याला बघून घाबरलाय असंही दाखवू नका.
भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी काय उपाय केले?
– २००१ मध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी सरकारने अँनिमल बर्थ कंट्रोल रूल्स (एबीसी) आणले. यात भटक्या कुत्र्यांची नसबंदी आणि लसीकरण आदी गोष्टींची चर्चा करण्यात आली.
– या अंतर्गत या कुत्र्यांची जबाबदारी प्राण्यांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या संस्था आणि स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांकडे देण्यात आली.
– या नियमांमध्ये असे कुत्रे मारण्याची तरतूद आहे जे कुत्रे आजारी आहेत, त्यांच्यावर उपचार करणं शक्य नाही किंवा ते जखमी आहेत आणि त्यांना बरं करणं शक्य नाही.
– या कायद्यात कुत्र्यांची नसबंदी आणि लसीकरण करून त्यांना परत सोडण्याबद्दलची चर्चाही करण्यात आली होती.
– कुत्र्यांनी चावलेल्या प्रकरणात वाढ होण्यासाठी हा कायदाच जबाबदार असल्याचं काही टीकाकारांना वाटतं.