युनुस तांबोळी
Shirur News : एखादी व्याधी किंवा दुखणे औषधाने बरे होणार नाहीत. असे रोग वा दुखणी योगाने बरी होतात. योगामुळे शरीर व मनाच्या सर्व व्याधी दूर होतात. अनेक दुखणी नियंत्रणात आणण्याचे साधन म्हणेज योग आणि प्राणायम होय.विद्याथ्यांनी आरोग्य संपन्न जीवनशैलीसाठी योग विद्या आत्मसात करावी. असे मत महागणपती स्कूलचे संस्थापक अध्यक्ष डॅा. विकास शेळके यांनी व्यक्त केले.(Shirur News)
महागणपती स्कूलचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विकास शेळके
रांजणगाव गणपती ( ता. शिरूर ) येथील महागणपती स्कूलच्या पटांगणात ९ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शेळके यांनी योग दिनाचे महत्व सांगितले. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांमध्ये योगासणाची अभिरुची निर्माण व्हावी व आरोग्य संपन्न जीवनशैली वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने योगा(Shirur News)
दिनाचे आयोजन केले होते.
शेळके म्हणाले की, सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अनेक ताणतणाव सहन करावे लागतात. विद्यार्थी देखील परिक्षा काळात तणावात येतात. प्रदुषण व रोगजंतूचा सामना करावा लागतो. नवनवीन रोग येऊ लागले आहेत. औषधांचही परिणाम होईनासे झालेत. उलट दुष्परिणाम होऊ लागेत. त्यासाठी सर्वांनी योग साधनेची कास धरावी. योगाने शरीर निरोगी, काटर, व लवचिक होते. शिवाय रोगप्रतिकार क्षमता वाढते.(Shirur News)
प्राचार्य गोळे म्हणाले की, योगविद्या आणि ध्यानधारणा ही भारतीय संस्कृती कडून अखिल विश्वाला लाभलेली अनमोल देणगी आहे व आरोग्य संपन्न आणि निरोगी जीवनासाठी योग विद्येचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली नलावडे यांनी केले.
यावेळी वि. भा. कळसकर, ज्योती साबळे, सुजाता शितोळे, स्वाती जलकोटे, स्नेहा चव्हाण, स्मिता गोळे, प्रियंका पवार, आब्बास शेख, शहनाज शेख, योगीता जाधव, नवनाथ महाराज माशेरे, निलेश फापाळे, अबेदा आत्तार, पद्मिनी कवठेकर, वंदना खेडकर, शुंभागी कालेकर, प्रवीण काळे, तृप्ती जठार आदी विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.(Shirur News)