पुणे : गर्भाशयाच्या कर्करोगावरील लस सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने तयार केली आहे. गर्भाशय कर्करोगाच्या रुग्णांसाठी सीरम इन्स्टिट्यूटने क्वाड्रिव्हॅलंट ह्युमन पॅपिलोमाव्हायरस ही स्वदेशी लस विकसित केली असून, सीरम इन्स्टिट्यूट आणि डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नाॅलाॅजीने आज लोकार्पित केली केंद्रीय मंत्री जितेंद्रसिंग यावेळी उपस्थित होते. गर्भाशयाच्या कर्करोग या घातक आजारावर मात करणारी प्रभावी लस भारतातच तयार झाली आहे.
ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने अलीकडेच सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला गर्भाशयाच्या कर्करोगावरील प्रभावी लस तयार करण्यास परवानगी दिली आहे.
स्वदेशी विकसित देशातील पहिली क्वाड्रिवेलेंट ह्यूमन पॅपिलोमावायरस वॅक्सीन गुरुवारी (ता. १) म्हणजेच आज केली जाणार आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या qHPV लसीला DCGI कडून 12 जुलै रोजी मार्केट ऑशरायझेशन मिळाले होते.
या आजारावरील प्रभावी लस भारत सध्या परदेशातून आयात करतो. त्यामुळे त्यासाठी जास्त खर्च येतो. आता ही लस देशातच उपलब्ध झाल्यामुळे लसीवरील खर्च कमी होऊन रुग्णांना अगदी सहज उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.