पुणे : सध्या जगभरात ओमायक्रॉनच्या BA व्हेरियंटच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होत आहे. अमेरिकेमध्ये यासाठी मॉडर्ना लसीच्या वापराला मंजुरी देण्यात आली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मायक्रॉनच्या B5 व्हॅरियंटचा अधिक प्रभाव दिसून आला आहे. त्याविरोधात आता विशेष लस निर्मिती सिरम इस्टीट्यूट (Serum Institute) कडून करण्यात येणार आहे, अशी माहिती “सिरम’चे प्रमुख अदर पुनावाला (Adar Poonawala) यांनी माध्यमांनी दिली आहे.
अदर पुनावाला म्हणाले, ” ओमायक्रॉन व्हेरियंटवर (Omicron Varient) लस (Vaccine) विकसित करण्यासाठी काम करत असून या वर्षाच्या अखेरपर्यंत ही लस भारतीय बाजारात येणार आहे. भारतात विकसित होणारी लस ही बूस्टर लसीच्या (Booster Dose) रुपात घेतल्यास ती प्रभावी ठरेल. भारतातील परिस्थीती पाहता ओमायक्रॉन व्हेरियंटविरोधात खास लस तयार करण्याची गरज आहे. हा व्हेरियंट गंभीर स्वरुपाचा असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे,”
जागतिक आरोग्य संघटनेने ( WHO) दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. जगातील 50 देशांमध्ये कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे. भारतात देखील कोरोना रूग्णांमध्ये थोड्याफार प्रमाणात वाढ होत आहे. सध्या परिस्थिती चिंताजनक नसली तरी देशातील आरोग्य व्यवस्था भक्कमपणे काम करत असल्याचं दिसत आहे.
भारत सर्वाधिक वेगान लसीकरण (Vaccination) पूर्ण करणाऱ्या देशांपैकी एक आहे. कोव्हॅक्सीन आणि कोव्हिशील्ड या दोन्ही लसी कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर तयार करण्यात आल्या होत्या.