(Sassoon Hospital) पुणे : जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी राज्यातील सराकरी कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे सर्व सरकारी सेवेवर ताण आला आहे. यामध्ये आरोग्यसेवेवर अतिरिक्त ताण वाढल्याने रुग्णांसह त्यांचे नातेवाईक तणावात आले होते. त्यामुळे संपावर गेलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची कामावर रुजू होण्याची वाट पाहिली, मात्र कोणताही कर्मचारी रुजून न झाल्याने ससून रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने नर्सेस नियुक्ती करण्यास सुरुवात केली आहे. अशी माहिती अधिष्ठाता संजीव ठाकूर यांनी दिली आहे.
1 महिन्याच्या कालावधीसाठी नर्सेसच्या भरतीला सुरुवात…!
पुण्यातील ससून रुग्णालयातील कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस या संपावर गेल्यामुळे नागरिकांवर किंवा रुग्णांच्या उपचारावर परिणाम होऊ नये यासाठी ही भरती राबविली जाणार आहे.
सरकारी अधिकारी, कर्मचारी जुनी पेन्शन लागू करा, या मागणीसाठी संपावर आहेत. याचा फटका पुण्यातील ससून रुग्णालयातील रुग्णांना होऊ नये यासाठी 1 महिन्याच्या कालावधीसाठी नर्सेसच्या भरतीला सुरुवात केली आहे.
ससून रुग्णालयातर्फे १०० नर्सेस तसेच वर्ग ४ श्रेणीचे कर्मचारी भरतीसाठी काल जाहिरात दिली होती. या पार्श्वभूमीवर आज ससून रुग्णालयात ३५ नर्सेस रुजू झाल्या आहेत. संपावर गेलेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनी परत कामावर यावे यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. तसेच रुग्णांना सेवेचा आभाव कुठे ही जाणवू नये यासाठी मेडिकल कॉलेज, इतर वैद्यकीय संस्थांनी ससून रुग्णालयात भरती प्रक्रियेत यावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
दरम्यान, जाहिरात काढून १०० नर्सेस आणि कर्मचाऱ्यांची १ महिन्यासाठी प्रोसेस सुरु केली असून ३५ कामावर रुजू झाले. महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना देखील आवाहन करण्यात आलं आहे. त्यानुसार ते देखील येण्याची शक्यता आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Sassoon Hospital | आरोग्य व्यवस्थेवर ताण ; ससून हॉस्पिटलचे डीन स्वतःच करतायत शस्त्रक्रिया!
भोसरीतील ओम हॉस्पिटलतर्फे जागतिक हृदय दिनानिमित्त हृदयरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन..!
WomenDay Special : लोणी काळभोर येथे विश्वराज हॉस्पिटलच्या वतीने वॉकेथॉनचे आयोजन!