आपल्या शरीरात पाणी हे अत्यंत गरजेचे असते. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीर चांगले राहते. पण शरीरातील उष्णता कमी करण्याचे मोठं आव्हान असते. त्यानुसार, काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी थंड पदार्थांचे सेवन करावे. त्याचप्रमाणे उष्ण पदार्थांचे सेवन करणे देखील टाळणे फार गरजेचे आहे.
तुम्हाला ज्यावेळी शरीरात उष्णता वाढली आहे, असे वाटत असेल तर एका टबमध्ये पाणी भरा. त्यात बर्फाचे तुकडे टाका. आता त्या टबमध्ये अर्धा तास पाय बुडवून ठेवा. यामुळे रक्तवाहिन्यांमधून जाणारे रक्त थंड होण्यास मदत होते. तसेच शरीराचे तापमानही कमी होते. यामुळे तुम्हाला जास्त उष्ण जाणवणार नाही. शरीरातील उष्णता वाढल्यास ती कमी करणे फार गरजेचे आहे. यासाठी तुमच्या आहारात थंड पदार्थांचा समावेश करणे फार गरजेचे आहे. यासाठी तुम्ही आहारात काकडी, आवळा, कलिंगड, खरबूज, ब्रोकोली इत्यादी पदार्थांचे सेवन करु शकता. यामुळे शरीरातील उष्णता कमी होऊ शकते. तसेच आरोग्यालाही फायदा होतो.
याशिवाय, बीटरुट, गाजर, लसूण, आले, आंबट पदार्थ आणि लाल मिरच्यांचे पदार्थ खाणे टाळावे. याशिवाय काळी मिरी, दालचिनी, लवंग यासारखे गरम मसाले शरीरातील उष्णता वाढवतात. शरीरातील उष्णता दूर करण्यासाठी ज्या पदार्थांमध्ये पाण्याचे अधिक प्रमाण असते त्याचे सेवन केल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो.