सध्या मंकीपॉक्स या व्हायरसचा वेगाने प्रसार होत आहे. फक्त भारतातच नाही तर जगातील अनेक देशांत मंकीपॉक्सच्या केसेसमध्ये वाढ होताना दिसत आहे. आफ्रिकेतील काँगोमधून मंकीपॉक्सची सुरुवात झाली. हा व्हायरस या देशातून इतर देशांमध्ये पसरला आहे. काँगोमध्ये मंकीपॉक्सच्या केसेसमध्ये वाढ होत आहे.
सध्या जगभरातील काही देशांमध्ये या व्हायरसचे केसेस नोंदवली जात आहेत. मंकीपॉक्सच्या लक्षणांबद्दल तुम्हाला जागरूक असले पाहिजे, जेणेकरून तुम्ही वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधू शकता. मंकीपॉक्समध्ये उच्च ताप, स्नायू आणि पाठदुखीची समस्या उद्भवू शकते. याशिवाय, गंभीर डोकेदुखी आणि सूज बाबतीत ताप उतरला की अंगावर पुरळ उठतात आणि हे पुरळ प्रथम चेहऱ्यापासून सुरू होतात आणि नंतर संपूर्ण शरीरात पसरतात. यानंतर खाज आणि वेदना होतात. त्यामुळे अशी लक्षणे दिसल्यास काळजी घ्यावी.
कसा करता येईल स्वत:चा बचाव?
स्वतः संक्रमित व्यक्तीपासून दूर राहा. स्वच्छतेची काळजी घ्या. वारंवार हात धुवा. इतकेच नाहीतर तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा आणि लसीकरण करा, ही काळजी घेतल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकते.