पुणे : पुणे शहरात गुलियन बॅरी सिंड्रोम (जी बी एस) या दुर्मिळ आजाराने थैमान घालायला सुरवात केली आहे. पुणे जिल्ह्यात ६७ रुग्ण आढळून आले आहेत. पुणे शहरातील सिंहगड रोड परिसरातील नांदेड गाव, किरकटवाडी आणि धायरी भागात या आजाराचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

पालिका आयुक्तांकडून पाहणी
या पार्श्वभूमीवर बुधवारी महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांच्याकडून नांदेड गावात पाहणी करण्यात आली. इथे असलेल्या विहिरीत शेवाळ चढलंय, याच विहीरीतून गावात पाणीपुरवठा केला जातया असतो. महापालिका या विहिरीबाबत आणि या आजाराबाबत काय उपाययोजना करणे गरजेचे असणार आहे. यावेळी महापालिका आयुक्त यांनी नविन समाविष्ट गावातील विहीरी, पाण्याच्या टाक्या व GBS आजाराने बाधित भागाची व आजाराने बाधित नागरिकांची त्यांचे घरी जाऊन, ऍडमिट असलेल्या हॉस्पिटल मद्ये जाऊन भेट घेवून पाहणी आणि चौकशी केली. आयुक्तांनी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आदेश व सूचना संबंधित सर्व मनपा विभागास व नवीन समाविष्ट गावांचे अंतर्गत नियंत्रित ग्रामीण जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांस देण्यात आल्या आहेत.
आजाराची नेमकी लक्षणं कोणती?
गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराचे पहिले लक्षण अशक्तपा आणि हातापायाला मुंग्या येणे हे आहे. आतापर्यंत पुण्यामध्ये या आजाराची लागण झालेले जे रुग्ण सापडले आहेत त्यांच्यामध्ये प्रामुख्याने हिच लक्षणं आढळून आलीत.

गुलियन बॅरी सिंड्रोमचा धोका पुण्यात वाढताना दिसत आहे. पुणे जिल्ह्यात ५९ रुग्णांमध्ये आणखी ७ जणांची भर पडल्यामुळे ही संख्या आता ६७ वर गेली आहे. यामुळे डॉक्टरांनी नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवड व ग्रामीण भागात मिळून जि बी एस रुग्णांची संख्या गुरुवारपर्यंत ६७ वर पोचली आहे. यामध्ये पुणे ग्रामीणमध्ये सर्वाधिक ३९, शहरात १३ पिंपरी चिंचवडमध्ये १२ तर ३ रुग्ण इतर जिल्ह्यांतील आहेत. जवळपास ८० टक्के रुग्ण हे खासगी रुग्णालयांत तर उरलेले २० टक्केच रुग्ण हे ससून या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सरकारी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

डॉक्टर काय म्हणाले?
गुलियन बॅरी सिंड्रोम पोस्ट वायरल आणि पोस्ट बॅक्टेरियल आजार आहे. हा आजार 1916 पासून आढळतो. भारतातच नाही तर जगात सर्वत्र आढळतो. दुर्मिळ आजार असला तरीही धोकादायक आजार नाही. स्नायू दुखणे, गुडघे दुखणे या आजाराची प्राथमिक लक्षण आहे. शिवाय दूषित पाण्यामुळे ही हा आजार होऊ शकतो. त्यामुळे पाणी गरम करून पिणे आणि उघड्यावरचं अन्न न खाणे, असा सल्ला सह्याद्री हॉस्पिटलच्या डॉ. आराधना चव्हाण यांनी दिला आहे.







