पुणे : दक्षिण केरळ आणि अरबी समुद्रात पूर्वेकडून एक सायक्लोनिक सर्क्युलेशन येत आहेत. ते चक्रीवादळात बदलणार का यावर हवामान विभाग नजर ठेवून आहे. बंगालच्या खाडीपासून काही अंतरावर आणि राजस्थानलगतच्या भागात हवामानात मोठे बदल होत असल्याचे दिसून येत आहेत. याचा परिणाम हवामानावर होत आहे. पहाटे गारवा तर दिवसा उन्हाचे तीव्र चटके जाणवत आहेत.

किमान तापमानात घट होत असल्याने पुन्हा गारठ्यात वाढ झाली आहे. कोकण किनारपट्टीलगच्या जिल्ह्यांमध्ये मात्र गारठा गायब झाला आहे. तिथे तापमान वाढत आहे. मुंबई, उपनगरात दमट वातावरणामुळे घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. तर ठाणे नवी मुंबईत पहाटे गारवा आणि दिवसा जास्त उष्णता जाणवत आहे. मुंबईच्या किमान तापमानात घट झाली आहे. मुंबईत सध्या संमिश्र वातावरणाचा अनुभव येत आहे. काही ठिकाणी निरभ्र आकाश तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. आजपासून तीन दिवस किमान तापमानात वाढ होईल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
पुण्यामध्ये सकाळी धुके आणि नंतर ढगाळ आकाश असणार आहे. पुण्यामधील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील काही दिवस पुण्यातील किमान तापमान स्थिर राहण्याची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्रातही हवामाना बदल जाणवत असून काही ढिकाणी ढगाळ हवामान असणार आहे. तर वातावरणातील गारठा काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे. उत्तर महाराष्ट्रात आणि विदर्भातील काही भागांमध्ये थंडीचा कडाका अजूनही कायम आहे. दुपारी मात्र उन्हाचे चटके बसत आहेत.








