Tuesday, April 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : जुन्नरमध्ये शेतात काम करणाऱ्या 40 वर्षीय महिलेचा उष्माघाताने मृत्यू ; निमगाव सावा परिसरात शोककळा

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 28 April 2026, 10:00

Pune News : जुन्नर, (पुणे) : राज्यात वाढत्या तापमानाचा पारा आता जीवघेणा ठरू लागला आहे. जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा येथे शेतात काम करत असताना उष्माघाताचा तडाखा बसून रुपाली भाऊ गाडगे (वय ४०) या महिला शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. उन्हाच्या तीव्रतेमुळे तालुक्यात मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना असल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. Pune News

 

रुपाली गाडगे या गेल्या दोन दिवसांपासून आपल्या शेतात कडक उन्हात खुरपणीचे काम करत होत्या. सोमवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास काम करत असतानाच त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. वाढत्या उष्णतेमुळे त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. Pune News

अस्वस्थ वाटू लागल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने निमगाव सावा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. तिथे प्राथमिक तपासणीत त्यांचा रक्तदाब (बीपी) अत्यंत कमी झाल्याचे समोर आले. डॉक्टरांनी तात्काळ उपचार सुरू केल्यावर त्यांच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा झाली होती. मात्र, पुढील तपासणीसाठी डायग्नोस्टिक केंद्राकडे जात असताना वाहनात बसण्यापूर्वीच त्यांना तीव्र चक्कर आली आणि त्या बेशुद्ध पडल्या. दुर्दैवाने, उपचाराला प्रतिसाद मिळण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. Pune News

रुपाली गाडगे यांच्या पश्चात पती आणि तीन मुले असा परिवार आहे. घरातील कर्त्या महिलेचा अशा प्रकारे अचानक मृत्यू झाल्याने गाडगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. निमगाव सावा आणि परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत असून, कडक उन्हात काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. संबंधित महिला शेतात काम करीत असताना चक्कर येऊन पडली. मृत्यू नेमका कशामुळे झाला? हे शवविच्छेदनानंतर स्पष्ट होईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. Pune News

प्रशासनाचे आवाहन
सध्या दुपारच्या वेळी तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे जात असल्याने नागरिकांनी विशेषतः शेतकऱ्यांनी दुपारी 12 ते 4 या वेळेत शेतात काम करणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि डोक्याला रुमाल किंवा टोपीचा वापर करावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. Pune News

 

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Banner theft : बाणेरमध्ये धक्कादायक चोरी; मोलकरणीचा WhatsApp स्टेटसच ठरला पुरावा

Tuesday, 28 April 2026, 13:25

Pimpari News : पिंपरीत हायटेन्शन टॉवरवर चढलेल्या व्यक्तीमुळे तणाव; अनेक तासांपासून सुरू नाट्यमय घडामोडी

Tuesday, 28 April 2026, 12:59

Hadapsar News : क्रेडिट कार्ड वसुलीच्या नावाखाली रस्त्यावर गुंडगिरी! भरदिवसा मारहाण; फक्त अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याने हडपसर पोलिसांवर संताप

Tuesday, 28 April 2026, 12:07
Pune News: District and Sessions Court grants bail to accused of possessing pistol and cartridges

Pune News : वाकड येथे स्वतःच्या मुलीवर अत्याचाराचा आरोप असलेल्या वडिलांची निर्दोष मुक्तता..

Tuesday, 28 April 2026, 11:09

Good News : क्षणाचीही विलंब न करता… चंदननगर पोलिसांची आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा वाचवला जीव

Tuesday, 28 April 2026, 10:49

Mumbai News : मुंबईत बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्यानंतर 12 तासांत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू ; अन्न विषबाधेचा संशय..

Tuesday, 28 April 2026, 10:21
Next Post

Pune Crime News : बुधवार पेठेतील 4 कुंटणखान्यांना पोलिसांनी ठोकले सील ; बेकायदा वास्तव्य करणार्‍या 3 बांगलादेशी महिला ताब्यात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.