Pune Illegal Liquor Case : उरुळी कांचन, (पुणे) : लोकांचे संसार उद्ध्वस्त करणाऱ्या विषारी दारू माफियांना पोलीस खात्यातीलच काही ‘काळे मेंढे’ पाठीशी घालत असल्याचा धक्कादायक प्रकार उरुळी कांचन आणि परिसरात उघडकीस आला आहे. पिंपरी चिंचवड आणि पुणे शहर परिसरात झालेल्या विषारी हातभट्टी दारूकांड प्रकरणातील मुख्य आरोपी राधेश्याम प्रजापती याच्याशी थेट कनेक्शन असल्याच्या आरोपावरून पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी मोठी कारवाई केली आहे. Pune Illegal Liquor Case

या प्रकरणात उरुळी कांचन, यवत आणि दौंड विभागातील एकूण 4 पोलीस अंमलदारांना शासकीय सेवेतून तातडीने निलंबित करण्यात आले आहे. अप्पर पोलीस अधीक्षक (बारामती विभाग) यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत या पोलिसांचे आरोपीशी थेट संबंध असल्याचे आणि त्यांचे वर्तन शिस्तप्रिय पोलीस दलाला अशोभनीय असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले आहे. Pune Illegal Liquor Case

अजित शिवाजी काळे, सुमित नंदकुमार वाघ, दोघांची नेमणुक-उरुळी कांचन पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण), रामदास ज्ञानदेव जगताप (नेमणुक – यवत पोलीस ठाणे, सुभाष बलभीम डोईफोडे (नेमणुक – उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, दौंड विभाग) असे बडतर्फ करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. Pune Illegal Liquor Case
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी अप्पर पोलीस अधिकारी (बारामती विभाग) यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष चौकशी समिती नियुक्त केली होती. चौकशी समितीने सखोल तपास केला असता, पोलीस हवालदार अजित काळे आणि सुमित वाघ हे दोघेही थेट विषारी दारूचा धंदा करणाऱ्या राधेश्याम प्रजापतीच्या संपर्कात होते आणि त्याला मदत करत होते, ही अत्यंत गंभीर बाब समोर आली. पोलिसांचे हे कृत्य पोलीस सेवेच्या अटी व शर्तींनुसार केवळ ‘गैरवर्तणूक’ नसून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळणारे आहे. या समितीच्या अहवालानंतर या दोन्ही पोलिसांच्या निलंबनाचे आदेश रात्री तातडीने निर्गमित करण्यात आले. Pune Illegal Liquor Case
निलंबन काळामध्ये हे दोन्ही पोलीस हवालदार आपल्या पदाचा आणि प्रभावाचा गैरवापर करून साक्षीदारांवर दबाव आणू शकतात, ही शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने त्यांच्यावर कडक निर्बंध लादले आहेत. दोन्ही निलंबित कर्मचाऱ्यांना पोलीस मुख्यालय पाषाण येथे दररोज हजर राहण्याची सक्ती करण्यात आली आहे. तसेच कार्यालय प्रमुखाच्या परवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई (बंदी) करण्यात आली आहे, तसे स्पष्ट आदेशात नमूद आहे. Pune Illegal Liquor Case
खात्यातील ‘बडे मासे’ बाजूलाच
उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील दोन हवालदारांवर कारवाई झाल्यानंतर स्थानिक पातळीवर वेगळीच चर्चा रंगली आहे. “हे कर्मचारी स्वतःसाठीच एवढी मोठी वसुली आणि गैरप्रकार करत होते की यामागे आणखी कोणी आहे?” असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. या संपूर्ण प्रकरणामागे एक मोठी साखळी कार्यरत असून, खात्यातील ‘बडे मासे’ बाजूलाच राहिले असून केवळ छोट्या कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा बनवण्यात आले आहे का, अशी शंका नागरिकांमधून उपस्थित केली जात आहे. Pune Illegal Liquor Case






