बेदाणे अर्थात मनुके आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. यामध्ये भरपूर प्रमाणत जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट असतात, ज्यामुळे शरीराला अनेक आजारांपासून संरक्षण मिळते. हे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते आणि विषाणूजन्य संसर्गापासून संरक्षण देखील मिळते.
मनुके रात्रभर पाण्यात भिजवून खाल्ल्यास त्याचे फायदे आणखी वाढतात. मनुक्यामध्ये ‘व्हिटॅमिन सी’ आणि अँटी-ऑक्सिडंट्स गुणधर्म आढळतात. जे ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करतात. यामुळे फ्री रॅडिकल्सचे नुकसान कमी होते आणि कर्करोगासारख्या धोकादायक आजाराचा धोकाही कमी होतो. मनुके हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. मनुक्यामध्ये पोटॅशियम, फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असतात, ज्यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते. हे कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करते आणि रक्त परिसंचरण सुधारण्यास देखील मदत करते, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.
मनुका ॲनिमियाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे, त्यात लोह, फोलेट आणि व्हिटॅमिन बी मुबलक प्रमाणात असते, जे हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते आणि ॲनिमिया दूर करते. बद्धकोष्ठतेपासून आरामही मिळतो. हे एक सुपरफूड आहे जे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यास मदत करते. फायबर समृद्ध मनुके पचनसंस्था मजबूत करतात. रात्रभर पाण्यात भिजवून ते खाल्ल्याने बद्धकोष्ठता, गॅस, ॲसिडिटी आणि अपचन यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.