Pimpri News : पिंपरी : पावसाळा येताच विविध साथीच्या रोगांच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असल्याचे पाहायला मिळते. त्यात डेंग्यूच्या साथीचादेखील समावेश असतो. महाराष्ट्रातही दरवर्षी डेंग्यूचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत असतात. पावसाळ्यात अनेक संसर्गजन्य आजारांचा प्रादूर्भाव होतो. नुकतीच डोळे येण्याच्या साथीमुळे पुण्यासह पिंपरी-चिंचवडची जनता त्रस्त झालेली असतानाच, पिंपरी शहरामध्ये ५१ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. शहरात जुलै महिन्यात ३६ रुग्ण आढळले होते. गेल्या महिन्यापासून डेंग्यू रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.
काळजी घेण्याचे महापालिकेचे आवाहन
दरम्यान, जून महिन्यात शहरात एकही डेंग्यूचा रुग्ण आढळला नाही. ताप आलेल्या ७७ हजार ६३१ रुग्णांची तपासणी केल्यानंतर डेंग्यूचे दोन हजार ९७५ संशयित रुग्ण आढळून आले. त्यामध्ये ५१ जणांना डेंग्यू झाल्याचे निदान झाले. यामध्ये जुलै महिन्यात ३६ जणांना डेंग्यूची लागण झाली होती. (Pimpri News ) या महिनाभरात १५ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे.
डेंग्यूची लागण झाल्यानंतर पहिल्या स्थितीत रुग्णाला अचानक थंडी वाजून ताप येतो. याशिवाय डोकेदुखी, अंगदुखी, हाडं आणि सांध्यांमध्ये वेदना होणे, मळमळ, अंगावर सूज आणि चट्टे येणे अशी लक्षणे दिसू लागतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार डासाने चावा घेतल्यानंतर ४ ते १० दिवसांत लक्षणे दिसू लागतात आणि २ ते ७ दिवसांपर्यंत असतात.
डेंग्यूचे डास स्वच्छ पाण्यात अंडी घालतात. त्यामुळे घराजवळील परिसरात पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी. (Pimpri News ) घराच्या मागच्या अंगणातील किंवा गच्चीवरील भंगारमालाची विल्हेवाट लावावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
डेंग्यूची लक्षणे आढळल्यास तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा. लवकर निदान होऊन त्यासाठी आवश्यक उपचार करणे शक्य होतात. (Pimpri News ) घर आणि घराजवळील परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार यांनी दिली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : पिंपळे सौदागर परिसरात १५ गाड्या फोडणाऱ्या गुंडांची सांगवी पोलिसांनी काढली धिंड..
Pimpri News : पिंपरी परिसरातून दुचाकी चोरणारी जळगावातील टोळी जेरबंद ; पाच लाखांच्या दहा दुचाकी जप्त