Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Beware of sunstroke : पुणेकरांनो; घराबाहेर पडताना काळजी घ्या ! सूर्य आग ओकणार.. तापमानात आणखी वाढ होणार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 18 May 2023, 11:03

Beware of sunstroke : मुंबई – राज्यात उन्हाचा पारा वाढत असल्याने नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. मुंबईसह महाराष्ट्रामध्ये वाढत असलेल्या उन्हाच्या तडाख्यामुळे नागरिक हैराण झाले असतानाच पुढील पाच दिवस तापमानाचा पारा आणखी वाढण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. (Beware of sunstroke) तसेच तापमानात वाढ झाल्याने उष्माघाताशी संबंधित आरोग्याच्या तक्रारी भेडसावतील असाही इशार आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.

दोन ते तीन अंशांनी तापमानात वाढ होण्याचा अंदाज

राज्यातील अनेक भागात ४३ अंश सेल्सियस पेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली होती. विदर्भ, मराठवाडय़ातील अनेक जिल्ह्यांत तापमान ४० अंश सेल्सियसपेक्षा जास्त असून यात आणखी भर पडल्यास उष्माघाताशी संबंधित आरोग्य तक्रारी वाढू शकतील, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.(Beware of sunstroke)

राज्यातील अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. पंधरा दिवसांहून अधिक काळ राज्यातील अनेक भागांतील कमाल तापमान ४० अंशांपेक्षा अधिक आहे. पुढील पाच दिवस दोन ते तीन अंशांनी तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. (Beware of sunstroke) मराठवाडा, विदर्भाच्या तुलनेत कमाल तापमान कमी असले तरी आद्र्रतेमुळे कोकण किनारपट्टीवर अधिक उकाडा जाणवत आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर किनारपट्टी भागात तापमान वाढीबरोबरच आद्र्रताही वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये बुधवारी ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक कमाल तापमान नोंदवण्यात आले. सर्वाधिक (४२.४ अंश सेल्सिअस) तापमानाची नोंद अमरावती आणि वर्धा येथे करण्यात आली.

दरम्यान यंदा उष्माघाताच्या रुग्णांमध्येही गेल्यावर्षीच्या तुलनेत दुप्पटीपेक्षा अधिक वाढ झाली आहे. राज्यात १ मार्च ते १७ मे या कालावधीत १६१६ उष्माघाताच्या संशयित रुग्णांची नोंद झाली. (Beware of sunstroke) गेल्यावर्षी याच कालावधीत ७६१ रुग्णांची नोंद झाली होती. उष्माघातामुळे सातत्याने शरीराचे निर्जलीकरण होऊन मेंदूतील रक्तवाहिन्यांमधील रक्त गोठून तीव्र झटका येण्याच्या शक्यता असते. यामुळे व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो. (Beware of sunstroke) मागील महिन्याभरात मुंबईतील प्रत्येक रुग्णालयांमध्ये साधारणपणे ८ ते १० रुग्ण दाखल झाले आहेत. त्यामुळे नागरिकांनी घरातून बाहेर पडताना आवश्यक ती काळजी घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.

 

उन्हात काम करणारे मजूर, कामगार, दुपारी फिरणाऱ्या तरुणांना ‘सेरेब्रल व्हिनस सायनस थ्रोम्बॉयसिस’चा त्रास दरवर्षी उन्हाळय़ामध्ये कमी अधिक प्रमाणात होतो. (Beware of sunstroke) मात्र मागील महिनाभरापासून हा त्रास होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. (Beware of sunstroke) रुग्णालयामध्ये महिनाभरात किमान ७ ते ८ रुग्ण आले असून, त्यातील किमान दोन रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता भासते आहे, (Beware of sunstroke) अशी माहिती मुंबईतील नायर रुग्णालयातील न्युरोलॉजी विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. पांडुरंग बारवे यांनी दिली.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Health | शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी जलजिरा सरबत उपयुक्त, जाणून घ्या रेसिपी आणि जलजिरा सरबत पिण्याचे इतर फायदे

Health Care| उन्हाळ्यात शरीराची उष्णता कमी करण्यासाठी करा ताडगोळ्याचे सेवन, जाणून घ्या ताडगोळे खाण्याचे फायदे

Health Care | युरिन इन्फेक्शनची समस्या दूर करण्यासाठी घरगुती उपाय

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

आधी अपंग करण्याचा कट, नंतर लोहगडवरून ढकलून करणार होते केतनची हत्या; कॉन्ट्रॅक्ट किलिंगच्या कटाचा खुलासा

Tuesday, 8 September 2026, 9:08

नळ स्टॉप ते माणिकबाग मेट्रोचा मार्ग मोकळा! कर्वे पुतळा, आंबेडकर चौकात उभारणार दुमजली पूल

Tuesday, 8 September 2026, 8:57

मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा मोठा परिणाम! मराठा विद्यार्थ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय, 200 कोटींचा निधी मंजूर

Tuesday, 8 September 2026, 8:29

महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल! 8 सप्टेंबरला कुठे बरसणार पाऊस? जाणून घ्या आजचा हवामान अंदाज

Tuesday, 8 September 2026, 8:14

Daily Horoscope: 8 सप्टेंबरला उघडणार नशिबाचे दरवाजे! या राशींना मिळणार मोठी संधी अन् धनलाभ

Tuesday, 8 September 2026, 7:45

हवामानाच्या बदलत्या चक्रामुळे बळीराजा संकटात! पाऊस पडणार की नाही? जाणून घ्या सविस्तर अंदाज

Monday, 7 September 2026, 22:57
Next Post

Bhosari crime : सोने म्हणून दिली पिवळ्या रंगाच्या धातूची बिस्किटे; ६५ वर्षीय महिलेची फसवणूक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp