आपल्या शरीराला सर्वात जास्त गरज असते ती विश्रांती अर्थात झोपेची. नियमित आणि पुरेशी झोप घेतल्यास अनेक आजारांपासून दूर राहता येऊ शकते. जर झोप ही नियमित अथवा पुरेशी घेतली नाहीतर अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यात हार्ट अटॅकसह स्ट्रोकचा धोकाही वाढू शकतोत. पण, अशा काही गोष्टी आहेत त्याकडे लक्ष दिल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकते.
चांगली झोप ही केवळ शरीराला विश्रांती देण्यापुरती मर्यादित नाही, तर हृदय आणि मनाच्या आरोग्यासाठीही ते खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला दररोज एकाच वेळी झोपण्याची आणि जागे होण्याची सवय नसेल, तर हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका 26 टक्क्यांनी वाढू शकतो, असे एका अभ्यासातून समोर आले आहे. अनियमित झोपेमुळे शरीराचे 24 तास चालणारे जैविक घड्याळ (सर्केडियन रिदम) असंतुलित होते. हे घड्याळ केवळ चयापचयच नव्हे तर हार्मोनल क्रियाकलाप देखील नियंत्रित करते.
जर तुम्हाला शांत आणि नियमित झोप हवी असल्यास काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचे आहे. त्यात ठराविक वेळी झोपणे आणि उठण्याची सवय ठेवा. झोपण्यापूर्वी स्क्रीन टाईम (मोबाइल, लॅपटॉप) कमी करा. रात्री हलके अन्न खा आणि कॅफिन टाळा. इतकेच नाहीतर झोपेचे वातावरण शांत ठेवा. झोपण्यापूर्वी वाचन किंवा ध्यान करण्याची सवय लावा. याने तुमच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.