लोणी काळभोर, (पुणे) : श्रीक्षेत्र थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायतीचे सदस्य युवराज हिरामण काकडे यांच्या वाढदिवसानिमित मोफत आरोग्य शिबीर व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन रविवारी (ता. १२) सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत करण्यात आले आहे. तसेच या शिबिरात रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याचा १० लाख रुपयांचा मोफत विमा काढण्यात येणार असल्याची महिती युवराज काकडे यांनी दिली.
डी. वाय. पाटील हॉस्पिटल, पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने थेऊर ग्रामपंचायत हद्दीतील डी.वाय. पाटील हॉस्पिटल तारमळा, थेऊर काकडेमळा रोड या ठिकाणी या शिबिराचे आयोजन अष्टविनायक प्रतिष्ठान थेऊर, पै. युवराजनाना काकडे युवा मंच व मित्र परिवार थेऊर, यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या शिबिरात मोफत हृदयरोग तपासणी, किडनी तपासणी, डोळ्यांची तपासणी व चष्मे वाटप, स्त्रीरोग तपासणी, कान नाक घसा तपासणी, रक्त तपासणी, हाडांची तपासणी, दातांची तपासणी, औषधे वाटप, दिव्यांग बांधवांना ओपीडी व उपयोगी वस्तू मिळणे कामी मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, सदर शिबिराचा थेऊरसह परिसरातील नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन युवराज काकडे व अष्टविनायक प्रतिष्ठान, थेऊर पै. युवराजनाना काकडे युवा मंच व मित्र परिवार, थेऊर यांच्या वतीने करण्यात आले आहे.