(Old Pension Scheme) पुणे : राज्यातील विविध सरकारी कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील रुग्णसेवेत कुठेही बाधा येऊ नये व विनाअडथळा सार्वजनिक आरोग्य सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध राहाव्यात यासाठी पर्यायी तसेच कंत्राटी मनुष्यबळाचा वापर करून नियोजन करावे, अशा सूचना राज्य शासनाने सार्वजनिक आरोग्य विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार यांनी राज्यातील उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांना पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत.
यंत्रणांशी योग्य तो समन्वय साधावा…!
संपाच्या काळात राज्यातील सर्वसामान्य जनतेसाठी अत्यावश्यक असणारी आरोग्य सेवा सुरु राहावी यासाठी व क्षेत्रीय यंत्रणांशी योग्य तो समन्वय साधावा. विशेषतः अत्यावश्यक सेवा, अतिदक्षता विभाग, लेबर रूम या संवेदनशील विभागांची सेवा अविरत सुरु राहील याबाबत दक्षता घ्यावी. पर्यायी मनुष्यबळाबाबत आवश्यक उपाययोजना आखून कुठल्याही परिस्थितीत सार्वजनिक आरोग्य संस्थांमधील रुग्णसेवा बाधित होणार नाही यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या आहेत.
रुग्णसेवेत बाधा येऊ नये यासाठी अपघात विभाग, आपात्कालीन कक्ष, रुग्णवाहिका सुसज्ज ठेवण्यात याव्यात, जेणेकरुन कुठल्याही आपात्कालीन परिस्थितीत रुग्णसेवा अखंडित सुरु राहील. क्षेत्रिय स्तरावर राष्ट्रीय आरोग्य अभियान व इतर कार्यक्रमांतर्गत उपलब्ध कंत्राटी मनुष्यबळ अत्यावश्यक वैद्यकीय सेवांसाठी नियुक्त करावे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
आवश्यकतेनुसार दैनंदिन तत्वावर जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये या ठिकाणी जिल्हा शल्य चिकीत्सक स्तरावर आवश्यतेनुसार दैनंदिन तत्वावर मनुष्यबळ नियुक्त करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. दैनंदिन तत्वावर मनुष्यबळ भरती करताना कंत्राटी सेवा लेखाशीर्षाअंतर्गत अनुदान उपलब्ध नसल्यास रुग्ण कल्याण समिती किंवा महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून मनुष्यबळ उपलब्ध करुन घेण्यात यावे, अशा सूचनाही आरोग्य विभागाने दिल्या आहेत.
संपामध्ये सहभागी कर्मचारी, आरोग्य संस्थामध्ये उपस्थित कर्मचारी, बाधित रुग्ण यांबाबतची दैनंदिन माहिती उपलब्ध करुन देण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या असून यासाठी राज्यस्तर, उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळे तसेच जिल्हा शल्य चिकीत्सक स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्या बाबत कळविण्यात आले आहे .
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Pune News : सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाय काय,आता; या सोनूचीच ,सोशल मीडियावर हवा