वाढतं वजन अनेक आजारांना आमंत्रण देऊ शकतं. त्यामुळे हे टाळायचं असल्यास वजन कमी करणे हाच एकमेव उपाय ठरतो. त्यात वाढत्या वजनामुळे अर्थात लठ्ठपणामुळे टाईप-2 मधुमेहाचा धोका वाढत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. हे संशोधन अमेरिकेत करण्यात आले आहे.
लठ्ठपणा शरीरातील एक महत्त्वाचा सेल्युलर बिल्डिंग ब्लॉक असलेल्या राइबोसोमल घटकांच्या उत्पादनावर परिणाम करतो. ज्यामुळे शरीरातील चरबी पेशी योग्यरित्या कार्य करू शकत नाहीत. परिणामी, शरीरात अतिरिक्त ऊर्जा साठते, ज्यामुळे टाईप-2 मधुमेह आणि इतर जुनाट आजार होऊ शकतात. तसेच लठ्ठपणामुळे शरीरातील राइबोसोमल घटकांच्या निर्मितीवर परिणाम होतो. रिबोसोमल घटक पेशींसाठी आवश्यक असतात आणि त्यांची कमतरता फॅट स्टेम पेशींना कार्यशील चरबी पेशी तयार करण्यापासून प्रतिबंधित करते.
तसेच शरीरात पुरेशा प्रमाणात राइबोसोमल घटक नसल्यामुळे ही समस्या उद्भवते. ज्यामुळे चरबीच्या पेशींचा आकार वाढू लागतो आणि शरीराची ऊर्जा अडकून राहते. ही ऊर्जा जमा होते आणि शरीरात समस्या निर्माण करते, यात टाईप-2 मधुमेहाचा धोका वाढतो. लठ्ठपणाने ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये फॅट टिश्यूचे प्रमाण जास्त असते, जे योग्यरित्या कार्य करू शकत नाही, ज्यामुळे शरीरातील चयापचय आणि ऊर्जा साठवण क्षमता कमी होऊ लागते. त्यामुळे वजन नियंत्रित करण्यावर भर देणं गरजेचे बनले आहे.