सध्याच्या जीवनात आपल्या आरोग्याकडे विशेष असं लक्ष द्यायला जमत नाही. त्यामुळे अनेक आजार बळावू शकतात. त्यात आपली शारीरिक गोष्ट देखील याला कारणीभूत ठरू शकते. लठ्ठपणा हा आता केवळ मांसाहारी लोकांमध्येच नाहीतर शाकाहारी लोकांमध्येही वाढताना दिसत आहे.
सध्या प्लांट बेस्ड् डायट हा सर्वोत्तम आहाराचा ट्रेंड खूप वाढला आहे. अनेक सेलिब्रिटींनीही मांसाहार सोडून वनस्पतींवर आधारित आहार घेण्यास सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत नुकत्याच झालेल्या संशोधनात एक नवीन माहिती समोर आली आहे. त्यात जे लोक शाकाहारी अन्न खातात, ते मांसाहार करणाऱ्यांपेक्षा जास्त अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड खातात. अल्ट्रा प्रोसेस्ड फूड्स हे असे खाद्यपदार्थ आहेत, ज्यात कृत्रिम संयुगे, संरक्षक, चव वाढवणारे आणि इतर रसायने असतात. अशा अन्नपदार्थांच्या अतिसेवनामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.
अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थांमध्ये ट्रान्स फॅट्स, सोडियम आणि शर्करा असतात, ज्यामुळे हृदयरोग, उच्च रक्तदाब आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. अशा पदार्थांचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो, ते रक्तातील साखर वेगाने वाढवतात आणि त्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. अल्ट्रा-प्रोसेस्ड खाद्यपदार्थांमध्ये भरपूर कॅलरीज, साखर आणि अपाय करणारे फॅट्स असतात. याच्या अतिसेवनामुळे लठ्ठपणा आणि संबंधित समस्यांचा धोकाही वाढतो.